पान:गोमंतक परिचय.pdf/30

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय ती संधी साधून फिरंग्यांनी १७४६ त भोसल्यांच्या मुलुखावर स्वारी केली व आखाड्याचा जंजिरा किल्ला, तेरेखोलचा किल्ला, रेडीचा किल्ला व सत्तर प्रांत, हाताखाली घातले. परंतु हे प्रांत त्यांच्याकडे फार काळ राहिले नाहीत. सोंधेकरांनी तीन गांव देण्याचे वचन पाळले नसल्यामुळे इ. स. १७५४ सालीं त्यांचे काणकोणांतील दोन किल्ले ( रामाच्या भूशीरावरील व सदाशिवगड ? ) फिरंग्यांनी घेतले व मदनगडावर हल्ला केला. परंतु केवळ लूटफाट करूनच त्यांना परत यावे लागले. मराठ्यांशी हैदराची युद्ध चालली होती त्यांत मराठ्यांचा मांडलीक म्हणून हैदराने सोंधेकरांचा साराच मुलुख बळकावला. त्यांकडे फक्त गोमंतक व कारवार प्रांत तेवढा राहिला. सोंधेकरांनी हैदराविरुद्ध मराठ्यांशी मदत मागितली होती पण उत्तर हिंदुस्थानांतील कारस्थानामुळे त्यांना इकडे लक्ष देण्यास फुरसद सांपडली नाही. अर्थातच सोंधेकरांनी पोर्तुगीजांकडे मदतीची याचना केली आणि फिरंग्यांनी देखील त्यांना मदत न करता केवळ हुलकावणीवरच ठेविलें. शेवटी सोंधेकरांनी पोर्तुगीजांशी तह केला व अंतरूज ऊर्फ फोंडा, व पंच महाल म्हणजे ( १ ) हेमाड बार्श ( २ ) जांबावली ऊर्फ अष्टाग्रहार, (३) काकोडें व बाळ्ळीसहीत चंद्रवाडी व काणकोण हे प्रांत वीस हजार असपर्त्यांच्या नक्त खंडाने त्यांना दिले. मात्र देतांना मुळची इनामें, उत्पन्नें, अग्रहार इत्यादि व रहिवाशांचे रीतरिवाज राखण्याची हमी त्यांकडून घेतली होती. तसेंच पुनः कधी काळी आपली गादी हैदरकडून परत मिळाल्यास हा मुलुखही पोर्तुगीजांनी त्यांनां परत द्यावा, असेंहि एक कलम या तहांत होतें. मराठ्यांना ही बातमी लागतांच अधिसत्तेच्या सबबीवर त्यांनी मर्दनगड हस्तगत करून तेथें ठाणे बसविलें. सन १७५६ त कोंद द आलूव्ह या व्हाइसरॉयनें मर्दनगडावर स्वारी केली परंतु त्यांना मराठ्यांनी यथास्थित मार देऊन हटविलें स्वतः व्हाइसरॉय ह्या युद्धांत कामास आला. इ. स. १७६३ त व्हाइसरॉय कोंद द यंग यांच्या हाताखालीं फिरंग्यांनी पन: मदनगडावर हल्ला करून त्याचा विध्वस केला. आणि लागोपात रामाच्या भूशीरावरील किल्ला घेऊन काणकोण, जांबावली वगैरे कि सत्ता बसविली. नंतर १७९१ त पुनः सोधेकरांकडचा करार कायम झाला. त्यावेळी पूर्वीची २० हजार असपर्त्यांच्या जागी १२ हजार असपर्त्यांची नेमणूक त्यांना ठरविण्यांत आली.