पान:गोमंतक परिचय.pdf/29

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण पहिले. हॉलंड, इंग्लंड, इत्यादि प्रोटेस्टंट संप्रदायी राष्ट्रांशी युद्ध चालू होतें तें पोर्तुगाललाही भोवलें व इ. स. १६०३ त हॉलंडच्या सैन्याने गोव्याला वेढा दिला. परंतु पुढे एकाच महिन्याने त्यांनी तो उठविला. इ. स. १६१० त पुनः गोव्यावर हॉलंडीज चालून आले. या वेळी त्यांनी मुसलमानांची मदतहि घेतली होती. त्यांनी गोव्याला वेढा दिला, मुरगांवला तोफा डागल्या आणि काही काळ मुरगांव येथे तळ देऊन ते निघून गेले. __ मराठे व वाडीकर भोसले यांच्याशी युद्धेः—पुढे सुमारे ५०६० वर्षे पोर्तुगीजांनां शांततेची मिळाली आणि मग गोवें, सासष्ट व बारदेश, या प्रांतांतून चालू असलेल्या जुलुमामुळे, नुकतीच जन्मलेली मराठी सत्ता व वाडीचे भोंसले यांनी फिरंग्यांबरोबर सारखें शतकभर युद्ध चालविलें. इ. स. १६८३ त श्री छत्रपती संभाजी महाराजांनी बारदेश प्रांतावर स्वारी केली व रायतूरच्या किल्ल्याला वेढा दिला. व्हायसरॉय कोंद दे आलव्होर हे मराठ्यांच्या हल्ल्यापुढे इतके हतबल व गर्भगळीत झाले की त्यांनी राजदंड जुनें गोवें येथील सें. फ्रान्सिस झेवीयरच्या थडग्यावर वैतागाने टाकून देखील दिला. तेव्हांपासून नव्या गव्हर्नरनें चार्ज घेतानां झेवीयरच्या थडग्यावरून राजदंड घेण्याची वहिवाट पडली. परंतु इकडे मोंगलांशी अखंड चाललेल्या युद्धामुळे मराठ्यांनां तो वेढा उठवावा लागला. व यापुढे सुमारे २५ वर्षेपर्यंत मराठ्यानांच स्वतःची संकटें निवारण्याची भ्रांत पडल्यामुळे त्यांचे हल्ले बंद पडले होते. इ. स. १७०६ त पोर्तुगीजांनी वाडीकरांची खोरजुवें व पनेळे ही बेटे घेतली. ____ इ. स. १७३९ त व्यंकटराव घोरपडे यांनी सासष्ट प्रांतावर व भोसल्यांनी बार्देश प्रांतावर एकाच वेळी हल्ला करून उभय प्रांत हिसकून घेतले. परंतु १७४१ त कोंद दे येरीसैर यांनी ब्राझील येथून १२ हजार फौज आणून तिच्या बळावर ते प्रांत परत मिळविले. व उलट वाडीकरांवर खंडणी बसविली. त्याचप्रमाणे दक्षिणेस सोंधेकरांना मराठ्यांविरुद्ध मदत देण्याचे कबूल करून पोर्तुगीजांनी त्यांच्याकडून पारोडे व तळवडे हे चंद्रवाडीतील गांव आणि फोंडें महालांतील हटकोळण हा गांव मिळविण्याचे वचन त्यांच्याकडून घेतले. फोंडा महाल व्यंकटराव घोरपड्यांनी सोंधेकरांकडून १७३८ तच घेतला होता आणि सोंधेकरांवर खंडणी बसविली होती. म्हणून सोंधेकरांनी हे गांव पोर्तुगीजांनां दिले नाहीत. मराठेशाही त्यावेळी पेशव्यांच्या हाती होती व त्यांच्या व भोसल्यांच्या नेहेमीं कटकटी चालू होत्या. पट पतला.