पान:गोमंतक परिचय.pdf/31

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण पहिले. राजधानीची अदलाबदलः–इ. स. १७५९ डिसेंबरच्या पहिल्या तारखेस राजधानी जुन्या गोव्यांतून पणजी येथे नेण्यांत आली. पुढे इ. स. १७७४ त जुन्या गोव्यांतून प्रमुख प्रमुख कुटुंबे निघाली होती. सरकारने कोमुनिदादीनां शहर पुनः बसविण्यासाठी सुमारे ८ लाख असा खर्च करायला लावले. परंतु तो उपक्रम निरुपयोगी होऊन इ. स. १८०३ सालीं जुनें गोवें पूर्णपणे मोडून गेले. उत्तर गोमंतकांत सत्ताः-इ. स. १७८१ साली वाडीकरांशी झालेल्या लढाईत पोर्तुगीजांनी पेडणे व भत्तग्राम ( सांखळी ) हे मुलुख मिळविले. परंतु ते मिळविण्यास लढाईपेक्षां पोर्तुगीजांनी अंतस्थ फाटाफुटीचाच विशेष फायदा घेतला होता. कोल्हापुरचे छत्रपति व भोंसले यांचे युद्ध चालले होते त्याचा त्यावेळी फिरग्यांनी चांगलाच फायदा घेतला. त्यांना पेडणे प्रांत छत्रपतीविरुद्ध वाडकरांनां केलेल्या मदतीदाखल भोगवटयास मिळाला होता. परंतु त्यांनी तो बळकावलाच. व शेवटी १७८८ साली उभयतांत तह होऊन पोर्तुगीजांनी तो कायमचाच आपल्या राज्यास जोडून घेतला. सत्तर प्रांत त्यांनी पूर्वीच म्हणजे १७४६ सालींच घेतला होता. सत्तरीच्या राण्यांनी मात्र फिरग्यांना मुळीच स्वस्थ बसू दिले नाही. इ. स. १७५५ सालींच त्यांनी पहिलीच उठावणी केली. परत १७८२ साली पोर्तुगीजांनी तो प्रांत आपल्या अमलाखाली आणला. तथापि तेव्हांपासून १८२२ पर्यंतच्या ४० वर्षांच्या अवधींत राण्यांनी चौदा वेळां स्वातंत्र्याचे प्रयत्न केले. परंतु चांगल्या नेत्यांच्या अभावी ते फसले व त्यांच्या कपाळी बंडखोर असा शिक्का बसला. १८२३ सालीं पोर्तुगीज गव्हर्नर दों मानुएल दे काम्र याने त्यांनां कडक शासन केले होते. तथापि १८२४ त पुनः सत्तर प्रांतांत स्वातंत्र्य युद्ध पुकारले गेलेंच. पेडण्यापुढे पोर्तुगीजांना सत्ताप्रसार करणे शक्य झाले नाही; कारण एक तर स्वतः पोर्तुगीजांची युरोपांतील सत्ताच कमजोर झाली होती शिवाय १८२२ ते १८३२ हा कालविभाग म्हणजे त्यांनां यादवीचाच गेला होता. ____हिंदी गर्व्हनरः-दरम्यानच्या काळांत सन १८३५ ते १८३७ ह्या सालीं गोमंतकाच्या इतिहासांत दुसराच एक बनाव बनून आला होता. पोर्तुगाल सरकारने गोमंतकावर बेर्नार्द पेरिश द सील्व्ह नांवाचे एतद्देशीय ख्रिस्ती ब्राह्मण गव्हर्नर नेमले होते. परंतु गोव्यांच्या सैन्यांत लूजो इंडियन ऑफीसर होते त्यांनी बंड पुकारून गव्हर्नरनां पदच्युत केले होते. दिपाजी राण्याचे बंड:-इसवीसन १८५१ सालीं गव्हर्नर व्हिश्कोंद द व्हील नोव्ह द औरें यांनी आपल्या कारकीर्दीच्या सुरुवातीसच खोट्या माहितीवर