पान:गोमंतक परिचय.pdf/28

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय हल्ला चढविला होता. त्याला आल्बुकेर्कनें जवळ केलें व उभयतांची जहाजें व सैन्ये एकत्र करून फारशी लढाई न करता त्यांनी गोवें शहर हस्तगत केले. मुसलमानी सैन्य भाणस्तारच्या रस्त्याने पळून गेले. शहराच्या कबजांत पोर्तगीजांना सासष्ट व बारदेश हे प्रांतही मिळाले होते. तेव्हां आल्बुकर्कने तिमय्याला गोवें बेटासह सासष्ट व बारदेश प्रांताचा वसूल एक लक्ष क्रुझाद (जवळ जवळ १ ) ठरवून मक्त्याने दिला. परंतु लागलीच मे महिन्यांत गोवें शहर आदिलशाही सैन्याने परत काबीज केले. तेव्हां आल्बुकेर्कनें पुनः कानानोर गांठले व त्याच सालच्या नवंबर २५ रोजी वाजत गाजत येऊन गोंवा भारावर पुनः हल्ला चढविला. घनघोर लढाईनंतर त्याच दिवशी त्याने तें काबीज आदिलशाही सैन्याने आल्बुकेकच्या गैरहजीरीत परत १५११ त गोव्याला वेढा दिला होता. परंतु योग्य वेळी मलाकाहून आल्बुकर्क परत आला व त्याने मसलमानांनां हांकून लाविलें. सासष्ट व बारदेश हे प्रांत मात्र आदिलशाही लाखालींच राहिले. १५१६ त पुनः एकदां आदिलशाही सैन्य गोंव्यावर बालन आले. परंतु हा हल्ला देखील घनघो लढाईनंतर परतविला गेला. १५२० त मसलमान गोव्यावर आले तेव्हां आल्बुकेकनें विजयनगरच्या दरबारांत त पर जकारण करून त्यांच्या मदतीने हाही हल्ला परतवून उलट मुसलमानांकडून सासष्ट व बारदेश हे प्रांत परत मिळविले. इ. स. १५३४ त रायतूर व बोरी येथे झालेल्या लढाईत पोर्तुगीजांकडून ते परत आदिलशाही अमलाखाली गेले. आणि इ. स. १५४३ त दो जुवांव द काश्त्रु याने फोंडे येथे इब्राहिम आदिलशहाचा मोड करतांच ते उभय प्रांत पुनः पोर्तुगीज सत्तेखाली आले. इ. स. १५५७ त पुनः आदिलशाही सैन्याने पोर्तुगीजांवर हल्ला केला. बार्देश प्रांतांतील मराद खानाच्या आधिपत्याखालील सैन्याचा मोड गव्हर्नर फ्रांसिस्कु दे बारेत यानें केला. व सासष्ट प्रांतावरील स्वारीचा मुख्य नझीर उल्मुल्ख याचा पराभव जुवांव पैशोत याने फोंडे मुक्कामी केल्याने ही स्वारी देखील फसली. पुनः १५७० त आदिलशाही व निजामशाही ही होन्ही सैन्ये एकवटून गोव्यांतून व इतरत्रही पोर्तुगीजांशी लढाई चालविली परंतु चेऊल येथे झालेल्या भयंकर पराभवानें मुसलमानांचा हा प्रयत्नदेखील फुकटच गेला. तेव्हां मुसलमानांनी तहाचे बोलणे लावलें व सासष्ट व बारदेश प्रांत कायमचे पोर्तुगीज सत्तेखाली आले. हॉलंडशी युद्धेः-ह्यानंतर सुमारे तीस वर्षे पोर्तुगीजांनां शांततेची लाभलीं होती. पोर्तुगालवर त्या वेळी स्पेनच्या फिलिप राजांची सत्ता चालत होती, व त्याच