पान:गोमंतक परिचय.pdf/27

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण पहिले. खिलजी नांवाच्या लष्करी सरदाराने सुभेदाराला पदच्युत करून गोवाप्रांत आपल्या सत्तेखाली आणला व स्वातंत्र्याची द्वाही फिरविली. परंतु इ. स. १४९५ तच महमदशहाबरोबर झालेल्या लढाईत खिलजी मारला गेला. महमदशहाने मुलूख इल मुलूख याला सुभेदार नेमले होते. इ. स. १४९७ त तो वारतांच त्याच्या मुलाने सुभेदारी आपल्या हाती घेतली. दरम्यानच्या काळांत बेदरच्या राज्यांत अंदाधुंदी माजल्याचा फायदा घेऊन उपरोक्त युझफ आदिलशहाने विजापूर येथे आदिलशाही स्थापन केली. तेव्हां या सुभेदाराने गोव्याचा अधिकार आपणाकडे कायम राखण्यासाठी आपण युझफ आदिलशहाचा अंकित आहे असे जाहीर केले. अशा रीतीने हा प्रांत आदिलशाही अमलांत आला खरा पण त्यांच्याकडेहि तो फार दिवस राहिला नाही. कारण पुढे १५१० तच पोर्तुगीजांनी आपली सत्ता गोव्यांत प्रस्थापित केली, तिचा इतिहास पुढे दिला जात आहे. मुसलमानी सत्ता किती वेळ टिकली:-वरील माहितीवरून गोमंतक प्रांतांत ११० ते १३१३ पर्यंत सुमारे १२०३ वर्षेपर्यंत कदम्बांची सत्ता चालू होती असे दिसून येते. पुढे १३१३ ते १३६७ पर्यंत म्हणजे चौपन्न वर्षे मुसलमानी सत्ता व १३६७ ते १४६९ पर्यंत विजयानगर व पुनः १५१० पर्यंत मुसलमान म्हणजे एकंदर ९५ वर्षे हा प्रांत त्यांच्या हाताखाली होता असे म्हणावें लागते. पैकी पूर्वीची ५४ वर्षे त्यांनी बेबंदशाहीतच घालविली आणि १५ व्या शतकांतील ४१ वर्षे म्हणजे राज्यक्रांति व उलथापालथ अशाखालीच गेल्यामुळे प्रजाजन त्यांच्या राजवटींत अत्यंत त्रासून गेले होते. आणि म्हणूनच १५१० त आलबुकेर्क येतांच त्यांनी मोठ्या उत्साहाने फिरंग्यांनां सहाय्य केले. त्यांना वाटले होते की, हे लोक आपल्याला संकटमुक्त करून शांतता देतील. पण काळाने त्यांसमोर दुसरेंच ताट वाढून ठेविले होते. त्याचे पुढे योग्य स्थळी वर्णन येईलच... LU अवाचीन इतिहास. पोर्तुगीजांचा प्रवेशः–इ, सन १५१० च्या फेब्रुवारीत फिरंग्यांनी आफोंस दे आल्बुके याच्या आधिपत्याखाली जुनें गोवें शहरांत प्रवेश केला. तुलव देशचा तिमय्या नांवाचा सरदार त्या वेळी विजनगरच्या आरमारावरील मुख्य अधिकारी होता. व विजयनगरच्या हुकुमावरून त्याने मुसलमानांवर समुद्रमार्गे