पान:गोमंतक परिचय.pdf/255

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय AU १ वालुवाति येमीलिय, सिंकेरी; २ वेलोय, नुव्हें; ३ बोर्वण, सिंकेरी; ४ कामुळे, राय; ५ दोशाझर, आसगांव; ६ मार्यान पीत, रेवोडें; ७ बोरचूण, ८ पेद्रुपीत; रेवो. ९ तळे, आसगांव; १० तळे, उसकई; ११ तळे, सेरुला; १२ कोदय, बाग: १३ कोदय, नांदोडें; १४ गणेशतळे, सत्तर; १५ लोखंडियें, फोडे; १७ लौटविहिर, शिरोडे; १८ मायण, शिवोली; १९ बर्डी, कांदोळी; २० ओबेशीक, वेरें ( फोडें । २१ वैलोवाडो, बेती; २२ वागवेलें, उसकई; २३ बाळशाचा झरा, वेळी; व २४ शेळ, म्हापशे. पिण्यास उत्कृष्ट पाण्याचे झरेः-१ पणजीचा गोमुख झरा; २ पणजीचाच फिनिक्स झरा; ३ पेडणचा 'सरमळा' झरा; ४ पनवेलचा बांयगिणी झरा; ६ आनाचा झरा, मडगांब; ७ चांदर येथील मदेल्यांतील झरा; ८ शिरोडेंचा वाजे येथील झरा व ९ आके येथील झरा. यांपैकी काहीं झांतून स्नानासाठी नळ वगैरे लावून सोय केली आहे. समुद्रस्नानाच्या जागाः--गोमंतकाच्या साऱ्या दर्याकिनाऱ्यावर या स्नानाच्या सोयी आहेत. उत्तेकडून दक्षिणेकडे यायचा क्रम स्वीकारून त्यांचे पुढे वर्णन जात आहे. मांद्रे व मोर्जीची वेळः-ही उत्तरेस थेट तेरेखोलच्या खाडी जवळ सुरू होऊन कायसुवच्या नदीमुखाशी संपली आहे. परंतु वेळेवर समुद्रस्नानास फारसे लोक जात नसतात... .कळंगुटची वेळः-म्हापशाहून मोटारीने २०।२५ मिनिटांतच या वेळेवर जाता येते. या किनाऱ्यावर मार्च एप्रिलच्या सुमारास बारदेश, सांखळी इत्यादि भागांतील बरीच कुटुंबे समुद्रस्नानासाठी येत असतात. नामांकित डॉक्टर, कुशल लेखक, यशस्वी कायदेपंडीत, धनिक व्यापारी, सुखवस्तु जमीनदार इत्यादि साऱ्या वर्गाचे व दर्जाचे लोक येथे येतात. दांकांठ देखील चार पांच मैल लांब आहे. सकाळी ८ पर्यंत व सायंकाळी साडे पांच ते सातपर्यंतच सारी गडबड असते. केगदीवेळ:-हा किनारा आग्वादच्या किल्यापासून जवळच आहे. तसे पाहिल्यास हा दर्याकांठ विस्ताराच्या मानाने बराच संकुचित आहे परंतु बरीच युरोपियन कुटुंबें देखील येथे येतात. मधून मधून हिंदूंची कुटुंबेंही असतात. पणजीहून वेर येथे येतांच रेइज्मागुश किल्ल्याखालूनच या किनाऱ्यावर जाता येते. यांच्या जवळच असणारा आग्वादचा किल्ला पोर्तुगीजांनी इ. स. १६१२ साली बांधला. आग्वाद या शब्दाचा अर्थ पाणवठा असा आहे. जुन्याकाळी गोव्यांतून पोर्तुगालला जाणारी