पान:गोमंतक परिचय.pdf/254

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ८ वें. साऱ्या गोमंतकांत १०१ त्रिस्ती चर्चे आहेत. त्यांतून बरीच प्रेक्षणीय आहेत. परंतु त्यांची आठवण काढतांच आमच्या हिंदू मनावर अनेक विकार विचारांची झांप एकदम पडते, तेव्हां मधून मधून त्याचें जें वर्णन आले आहे तेवढेच पुरेसें मानून विराम घेणें प्राप्त आहे. गोमंतकीय झरेः--औषधि पाण्याचे व मधुर जलाचे असे अनेक झरे गोमंतकभर आहेत. परंतु त्यांचा उपयोग आधुनिक वैद्यकीय साधनानी अजून करून घण्यात आलेला नाही. त्यांची त्रोटक माहिती पुढे जात आहे. लाहयुक्त झरेः-१ सत्तर प्रांतांतील करंझोळ गांवी असलेला झरा; याचे पाणी गार्ड व चवदार आहे. २ कांदोळी ( बारदेश ) येथे 'सकैली झर' या नावाने प्रसिद्ध असलेला झरा, याचे पाणी जरा चवीस कमी असते. आग्वादच्या तटाखालींच तो आहे. ३ काबच्या राजवाड्याजवळ असलेला झरा चवीत तसाच कमी आहे. ४ सासष्ट महालांतील आंबोडेचा झरा. ५ केगदी वेळेवरचा झरा. ६ बेतींचा डोंगरांतील मायणचा झरा. ७ आग्वादच्या किल्ल्यांतील झरा. हा झरा लोहयुक्त आहे खरा, पण पाणी मात्र पिण्याच्या लायकीचे नसते. बारेटेड पाणीः-१ असनोडेच्या पाण्याइतके चांगले बोरेटेड पाणी गोव्यांत इतरत्र मुळीच मिळत नाही. शेकडों माणसें दरसाल त्या स्नानाचा फायदा त्वचा रोगांवर घेत असतात. २ आंबेशेचा झरा; हा देखील उत्कृष्ठ झरा असून त्याचे पाणी पिण्याला उत्तम असतें. ३ कांदोळी येथे 'वैली झर' नावाने प्रसिद्ध असलेला झरा; याचे पाणी सांठलेलें व कुजके असतें. । कॉरेटेड पाणीः-१ कांदोळी येथील समुद्रकांठचा झरा. २ मांद्रे येयील अलकलीन झरा. ३ कणसूव येथील व्होळ नांवाचा झरा. ४ फोंडेची 'कोकांव' नावाची झर. ५ फोंडे येथील सां प्रेद्रूचा झरा. कार्बोनेटेड पाणीः-१ केळोशी येथील राइदोरचा झरा. याचे पाणी बरेच कार्बोनेट असते. २ फातर्फेचा झरा. ३ सत्तरीतील बिंबलचा झरा. ४ बेतूलचा झरा व ५ सत्तरीतीलच दोबासो नांवाचा झरा. म्याग्नेशियम पाणीः-१ कुंडई येथील झरा व २ केरी, (फोंडा) येथील झरा. - गंधकमिश्र पाणीः-१ फोंडे येथील “कामील पीत" झरा. २ शिरोडे येथील तरवळेचा झरा. ३ तेथीलच कराचा झरा. ४ नाचनोडेचा 'गोंगों' नांवाचा झरा. खनिज पाण्याच्या या झऱ्याखेरीज बाह्य रोगांच्या शमनासाठी उपयोगी असे असे पुष्कळ झरे आहेत ते पुढे जातात.