पान:गोमंतक परिचय.pdf/256

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ८ वें. जहाजे येथेच पाणी पुरवठा करीत, म्हणूनच आग्वाद हे नांव त्या जागेला मिळाले आहे. किल्ल्याच्या मध्यभागी एक २८ हात उंच बुरूज असून त्यावरच आग्वादचा प्रसिद्ध दिवा आहे. हा दिवा पोर्तुगीजांनी प्रारंपासून तेवत ठेविला होता. पूर्वी तो फक्त उन्हाळ्यांतील अंधाऱ्या रात्रीच पेटवीत असत. पुढे १८६८ सालापासून तो साऱ्या वर्षभर पेटविण्यात येत आहे. तूर्त हा दिवा तासाला तीस फेरे करणारा आदि जातीचा आहे. आग्वादच्या किल्ल्यांत भूगर्भात एक विस्तीर्ण हौद बांधला असून, त्यांत पावसाचे पाणी साठवून ठेवण्यात येत असते. जुन्या गोव्यांतील सांत आगुश्तीन्यचा कोव्हेंत जमिनदोस्त होतांच, तेथील प्रचंड घंटा याच किल्यांत आणून ठेविली असून तिचे वजन ४८ शें रत्तल आहे ! दारू गोळ्याच्या सुधारणेमुळे तूर्त या किल्ल्याचा लढाईत उपयोग होणे शक्य नाही. येथे पोर्तुगीज सरकारचे लष्करी कैदी व राजकीय कैदी ठेवण्याचा रिवाज आहे. __ करंझाळेची बेळः-पणजीहून दोना पाव्लास जातांना हा दर्याकांठ उजव्या हाताला मिळतो. तो सुमारे दोन मैल लांब आहे. पणजीचे सारे युरोपियन, ख्रिस्ती वगैरे वरिष्ठ अधिकारी व बरीच हिंदू कुटुंबे येथेच उन्हाळा घालवितात. कायचा राजवाडाः--हा पूर्वी १६ व्या शतकांत फ्रांसिस्कान पान्यांनी आपल्यासाठी कोंव्हेत म्हणून बांधला होता. याच्या भोंवतीं त्यावेळी तटबंदी होती, तिचा काही भाग अजूनही दिसतो. सतराव्या शतकांत आर्चबिषपर्ने हे आपले उन्हाळ्याचे स्थान बनविले. पुढे इ. स. १८१६ च्या सुमारास कोंदि द रीयु पार्दु या गव्हर्नरने हा कोव्हेत दुरुस्त करून आपली तेथे राहण्याची सोय केली. तरीपण आर्चबिषपनी त्यावरील ताबा सोडला नव्हता. इ. स. १८५५ साली गव्हर्नरनी सरकारी खर्चानें पुनः कोंव्हेंताची दागडुजी करून त्याला राजवाड्याचे स्वरूप दिले. व तेव्हापासून गोव्याच्या गव्हर्नरचें तें उन्हाळ्यांतील स्थान बनले. अलीकडे तर सारे वर्ष गव्हर्नर तेथेच राहतात व मोटारीने कामापुरते पणजीत येत असतात. कांसावलीची वेळः--विस्तीर्णतेत ह्या दर्याकांठाएवढी मोठी दुसरी स्नानाची जागा गोव्यांत नाही. उत्तरेस दाभोली पासून सुरुवात होऊन ती दक्षिणेस बेतुलच्या खाडीपर्यंत पसरली आहे. सासष्ट, सांगें, के, इत्यादि कोसेल्यांतील सर्व धर्माची व दर्जाची कुटुंबे येथे मार्च एप्रिलमध्ये दिसतात. दर्याकांठीं कांसावली, वेळसांव, माजोर्डे, कोलवे, बाणावली वगैरे सर्व ठिकाणी अल्पस्वल्प भाड्याने बंगले वगैरे सोयी होतात.