पान:गोमंतक परिचय.pdf/250

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ८ वें. सुमारे १२ हजार रुपये असून ७ हजारांवर खर्च होत असतो. श्री शांतादुर्गा व श्री मंगेश या देवस्थानांबरोबर या देवळांतही पठाणांनी हात मारला होता. श्री कालिकादेवी, कांसारपाल:--हे देवालय दैवज्ञ ब्राम्हणांचे असून सुंदर आहे. येथे वरेच उत्सव प्रेक्षणीय होतात. देवालयाचे शिखर सोनेरी पत्र्याने मढविलेले आहे. सालिना उत्पन्न सुमारे ३।४ हजारांचे असून तेवढाच खर्च होतो. या देवालयाच्या उत्पन्नाची प्रमुख बाब म्हणजे, दैवज्ञ सुवर्णकारांच्या कार्यागारांतील केराच्या लिलांवांतून उत्पन्न होणारा पैसा हेच आहे. श्री महालक्ष्मी पणजी ( स्थापना इ. स. १८१७;); श्री. मारुती, म्हापशे; श्रीं सांतेरी, खोली ( बारदेश ); श्री विठ्ठल, ओंसाभाट, म्हापशें; श्री शांतादुर्गा, असनोडें; श्री भूतनाथ, नांदोडें; श्री पांडुरंग, बेती; श्री शांतादुर्गा, पीर्ण; श्री लक्ष्मीनारायण शिवोली; श्री विठ्ठलमंदीर, मडगांव; श्री चंद्रेश्वर भूतनाथ ( पर्वतावरील ) पारोडे; श्री सांतेरी, पारोडे; श्री रामनाथ, तळवड; इतकी देवालये जुन्या काबिजादींत १९२९ त होती या पैकी काही अगदी ( नवीन रिपब्लिकोत्तरकालीन ) आहेत. प्रमुख प्रमुख देवालयांतून दरसाल शिलकी पडणारी रक्कम सुमारे २५।३० हजारांची तरी असावी. या रकमेमुळे गरजूंना ब्यांकेप्रमाणे देवालयाचा उपयोग होत असतो. तरी पण तिचा यापेक्षाही उपयुक्त असा विनियोग म्हणजे धार्मिक शिक्षणाकडे ती खर्च करणे हा होय. पण तसा काल यायला अजूनही बराच कालावधि लोटला पाहिजे असे मोठ्या खेदाने म्हणावे लागते. ___ वर दिलेल्या प्रमुख देवालयाखेरीज जुन्या काबिजादीतील प्रत्येक गांवांत एक एक देऊळ असतेच. पण विस्तारभयास्तव त्यांचा उल्लेख टाळला आहे. श्री कैवल्यपूर संस्थान, कवळे:--हें संस्थान स्मार्त संप्रदायी गौड सारस्वत ब्राम्हणांच्या धर्मगुरूंचे आहे. व त्याची परंपरा परमपूज्य श्रीमद्गौडपादाचार्यापासून उत्पन्न झाली असल्याने, मठाधीशांनां श्री गौडपादाचार्य हे उपपद लावण्यांत येत असते, पूर्वी हा मठ सासष्ट प्रांतांत मडगांव (मठग्राम), केळोशी व कुशस्थली येथे होता परंतु जुलुमांच्या काळी देवस्थानाबरोबर त्यावरही गदा आली व धर्मगुरूंना स्थलांतर करावे लागले. संस्थानाला छत्रपति श्री शाहूमहाराज,सातारा; श्रीमंत माधवराव पेशवे श्री. खेमसांवत भोसले,सांवतवाडी;श्री लखम सांवत भोंसले, हेरें संस्थान; श्री सयाजिराव गायकवाड, बडोदें (शके १६९७); श्री. कृष्णराव भगवंत पंत अमात्य इत्यादिकांकडून गांवगन्ना नेमणुका मिळालेल्या आहेत. मठाचे उत्पन्न सुमारे १०।१२ हजार रुपयांचे असून खर्चही तसाच दांडगा आहे. मठांतून पूर्वी संस्कृत पाठशाळा चालत होती. मठातर्फे होणारा वार्षिक