पान:गोमंतक परिचय.pdf/249

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय त्यामुळे हे बरेच खुलून दिसते. सालिना याचे उत्पन्न सुमारे चार पांच हजार रुपये असून चार साडेचार हजार खर्च होत असतो. श्री नागेश बांदिवडें:--हें देवालय, सोंधेकरांच्या राजवाड्याजवळ आहे. हे लहानसेंच असले तरी पुढच्या नयनमनोहर तलावामुळे अत्यंत आकर्षक आहे. या तलावासारखा सुंदर व स्वच्छ तलाव गोमांतकांत दुसरा नाहींच म्हटले तरी चालेल. याचे मूळस्थान देखील बांदिवडेच होते असें दणाईत आपल्या इतिहासांत सांगतात. कौशिक गोत्रीय प्रतापराव सरदेसाई व प्रियोळकर याचे महाजन आहेत. श्री म्हाळसा, म्हाडदोळ:--ही देवी पूर्वी सासष्ट महालांतील वेणे या गांवीं डोंगरावर होती. अजूनही त्या देवालयाचा अवशेष तेथे असून त्याला जुने म्हाडदोळ या नावानेच ओळखतात. रायतुरच्या बहाद्दर दियोग रुद्रीगची कु-हाड याच देवालयावर पहिल्याने पडली होती. प्रियोळ गांवांत श्री मंगेशीच्या जवळच हे देवालय आहे आणि त्यावरूनच त्या वाड्याला म्हाडदोळ हे नांव मिळाले आहे. कौशिक, भारद्वाज, इत्यादि पांच गोत्रांचे गौड सारस्वत ब्राह्मण व कित्येक द्रविड ब्राह्मण, वैश्य, मराठे इत्यादिही याचे महाजन आहेत. सालिना उत्पन्न सुमारे चार हजार रुपये असून तेवढाच खर्च आहे. देवालयाचे बांधकाम जुन्या धर्तीचे असून चौक मोठा विस्तीर्ण व प्रेक्षणीय आहे. वेणे येथील जुनें देवालय बरेच प्रचंड व गढीसारखे होते आणि तें एक दोन वेळां पोर्तुगीजांना किल्ल्याप्रमाणे आसरा घेण्यास उपयोगी पडले होते. सरकारी रीत्या होणारे शपथविधि याच देवळांत होत होते. ही एकंदर देवस्थाने पहावयाची झाल्यास पणजीहून बेळगांवच्या मोटारीने निघावें, मडगांवहन रासईच्या मोटारीने येऊन दुर्भाट येथून जावें, किंवा सावर्डे -पणजीच्या लाँच सव्हिसने निघाले पाहिजे. बहुतेक साऱ्या देवालयांतून त्रिकाल नौबदीचा चौघडा झडत असल्यामुळे हिंदी संस्कृतीचा हा ठेवा मनाला फारच आल्हाद देत असतो. श्रीदामोदर, जांवावलीः-हें देवालय मुळचे मडगांवचे होय.रासईच्या रस्त्याने जाताना उजवीकडे अजून त्याची जागा व तलाव दिसतात. त्याचा पोर्तुगीजानी उच्छद कल्यावर रिवण गांवच्या जांबावली वाड्यावर प्रतिमा नेण्यात आली. देवालयाचे महाजन भारद्वाज, कौशिक, वगैरे गोत्रांचे सारस्वत ब्राह्मण असून इतरही पुष्कळ लोक याला भजतात. उत्पन्न सुमारे सात आठ हजार असून तेवढाच खर्च होत असतो. श्रीमल्लिकार्जुन, काणकोणः-काणकोणच्या कसब्यांतून या देवाळाकडे मोटारीने जाता येते. हे मुळचे द्रवीड वंशाच्या हबू लोकाचे देवालय होते. तूर्त त्याचे महाजन कोणकोण कोंसेल्यांतील मराठे व गौड सारस्वत ब्राह्मण आहेत. सालिना उत्पन्न