पान:गोमंतक परिचय.pdf/251

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय ११२ श्री गणेशोत्सव प्रेक्षणीय असतो. काशी, गोकर्ण, नाशिक, मुंबई, खानापूर, इत्यादि पुष्कळ ठिकाणी मठ असून तेथें पूजा अर्चा होत असते. विद्यमान मठाधीश श्रीमत्पू र्णानंद सरस्वती हे ७४ व्या परंपरेचे आहेत. हे मोठे कर्तबगार व बुद्धिमान असून संस्थानची सांपत्तिक स्थिति त्यांनी आपल्या अमदानीत पुष्कळच सुधारली आहे. तूर्तच्या मठाची इमारत नुकतीच जीर्णोद्धार करून यानींच बांधून घेतली असून ती भव्य व प्रेक्षणीय आहे. श्री पर्तगाळ संस्थान, पर्तगाळः-ह्या मठाची स्थापना अलीकडची म्हणजे पंधराव्या शतकांतील आहे. उडपीच्या द्रवीड ब्राह्मणांतर्गत फलमार मठापासून या संस्थानची परंपरा सुरू झाल्यामुळे, मठाधीशांना श्रीपादवडेर असें उपपद लागते. मठाकडे जायला कोणकोण येथून मोटारी जाण्याजोगा रस्ता आहे. मठाची इमारत भव्य व प्रेक्षणीय असून ती अलीकडेच जीर्णोद्धार करून बांधली आहे. गोमंतक, महाराष्ट्र, उत्तर हिंदुस्थान, इत्यादि प्रदेशांतील सारे माध्व मतानुयायी गौड सारस्वत ब्राह्मण याच मठाचे अनुयायी आहेत. सांप्रत श्री मत्कमलाकांततीर्थ स्वामींची कारकीर्द चालत असली, तरी त्यांचे गुरुवर्य श्री मदिदिराकांततीर्थ स्वामी अद्याप विद्यमान आहेत. गुरूंनी मुद्दाम अधिकारन्यास करून शिष्यांच्या हाती अधिकार दिला. आहे.श्री मदिंदिराकांततीर्थ स्वामी हे संस्कृतांत व वेदांतांत बरेच अधिकारी समजले जातात. मठाचे उत्पन्न सुमारे वीस हजार रुपयांचे असून सुमारे १५ हजार रुपये खर्च होतात. मठांतून दरसाल होणारा श्री रामनवमीचा उत्सव मोठ्या थाटाचा होत असतो. पात्रियार्कादु द गोअ व चर्चेः--इ. स. १६३४ सालीच गोव्यांत बिषपची गादी स्थापन झाली व इ. स. १५३८ साली त्याचा दर्जा आर्चबिषपचा करण्यांत आला. विषपचे वास्तव्य पूर्वी जुन्या गोव्यांत होते. परंतु त्या शहराचा नाश होतांच पणजीच्या टेकडीवरील उंच जागी त्यांना भव्य वाडा बांधून देण्यांत आला. हिंदुस्थानांतील पोर्तुगीज चर्चवर यांची अधिसत्ता चालत असून कोची, दमण वगैरे ठिकाणच्या विषपवर त्यांचा अधिकार चालतो. रिपब्लिकपूर्वकाली या धर्मपीठाची सत्ता नेहमी राजसत्तेवर कुरघोडी करीत असे. गव्हर्नरच्या गैरहजीरीत पूर्वी कोसेल्यु गोव्हन तीव्ह नांवाचें जें कौन्सिल राज्यकारभार हांकीत असे, त्याचे अध्यक्षस्थान आर्चबिषपकडेच येई. तूर्त गोवें व हिंदुस्थानांतील इतर पोर्तुगीज चर्चे मिळून आचबिषपसहित सुमारे दोनशांवर पाद्री नोकरीत आहेत. ख्रिस्ती धर्मखात्यावर आजला दरसाल ६० हजार रुपये सरकार खर्च करिते. त्यांत आर्चबिषप, विषय, हिंदुस्थानांतील मिशनरी पाद्री व सेमिनारी यांचा खर्च येत नाही. तो निराळाच राहिला.