पान:गोमंतक परिचय.pdf/25

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण पहिले. चंद्रपूर म्हणजे आजचें चांदर येथे होती. इ. स. ४७९ साली चालुक्य वंशीय राजांनी कदंबाचे स्वातंत्र्य नष्ट करून त्यांना आपले मांडलिक बनविलें. परंतु पुढे इ. स. ८९९ त चालुक्य राजांवर बेळगांव नजीक सुगंधवीत ऊर्फ स्तुदंती (आजची सौंदत्ति ) येथील राठ नांवाच्या जैन धार्मिक राजांनी स्वारी केली व गोमंतक प्रांतासहित सारें राज्य आपल्या सत्तेखाली नेले. नंतर इ. स. ९७४ त म्हणजे फक्त पाऊणशे वर्षांनीच चालुक्य वंशीय प्रतापी, तैलाप नांवाच्या राजाने आपल्या पूर्वजांचे राज्य राठांकडून परत घेतले. ह्याच वेळी षष्टदेवाचा पुत्र जयकेशी यानें संधि साधून तैलापाशी सख्य जोडले व आपलें स्वातंत्र्य परत मिळवून गोपकपट्टन म्हणजे थोरलें गोवें येथे आपली राजधानी नेली. त्याच्या मागून त्याचा पुत्र विजयादित्य याने वीस वर्षे राज्य केलें व त्या नंतर त्याचा मुलगा जयकेशी दुसरा याने राज्य चालविले. हा राजा विद्वानांस उत्तेजन देई व विद्यार्थ्यांस मदत करी. खास चालुक्य वंशीय विक्रमार्क महिपति याच्या मैलाल महादेवी नामक कन्येशी जयकेशीचा विवाह झाला होता; इतकी त्याने आपली सत्ता प्रबल करून घेतली होती. द्वारसमुद्राचा राजा बल्लाळ याने इ. स. ११२८ सांत सान्या कोंकणांत उच्छाद मांडला होता. परंतु त्याचाहि पराभव जयकेशीने केला होता. इ. स. ११९३ पर्यंत या वंशांत शिवचित्त पर्माडीदेव, विष्णुचित्त व वीर जयकेशी या नांवाच्या राजांनी राज्य केले. त्या साली पुनः बल्लाळ राजांनी गोमंतकावर स्वारी केली व कदंबांनां मांडलिक बनविलें. या बल्लाळांच्या अधिसत्तेखाली कदंब फारच थोडी वर्षे म्हणजे केवळ १९ वर्षेच राहिले. कारण १२१२ साली देवगिरीच्या यादवांनी गोमंतक आपल्या सत्तेखाली घेऊन कदम्बांकडून करभार घ्यायला सुरुवात केली. यादवांनी कदम्बांवर १०१ वर्षे अधिसत्ता चालविली. मुसलमानांचा प्रथम प्रवेशः-इ. स. १३१४ साली देवगिरीचे राज्य मुसलमानांनी बुडवितांच कदम्बांची सत्ता पूर्णपणे नष्ट झाली. मुसलमानांनी गोमंतकांत येऊन कदम्ब राजवंश बुडविला व देवालयांत विध्वंस करून सगळीकडे बेबंदशाही माजविली. याच सुमारास वरंगूळच्या राजाचे राजगुरु विद्यारण्य माधव यांनी राजाच्या कोशाध्यक्षाचे पुत्र हरिहरराय व बुक्कराय यांनां बरोबर घेऊन तुंगभद्रा नदीच्या तीरीं अनागोंदीच्या जागी विजयनगर नांवाचे नवीन शहर स्थापून राज्य उभारलें, सिंहासनावर बुक्कराय बसला व विद्यारण्य माधव ह्याला प्रधानपद दिले. हे वर्तमान इ. स. १३३५ त घडलें.