पान:गोमंतक परिचय.pdf/24

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण पहिले. विभाग दुसरा. प्राचीन इतिहास. -193EEEEइतिहासांत गोमंतक अथवा गोमांतक हे नांव मिळाल्यापासून थेट पोर्तुगीजांच्या स्वारीपर्यंतची माहिती या सदराखाली आम्ही देणार आहों. तक है नांव कसे पडले:-असे सांगतात की, श्री परशुरामानें यी दान केल्यानंतर त्रिहोत्रपुराहून गौडसारस्वत ब्राह्मणांना आणवून जेथें यज्ञ केला होता त्या प्रदेशाचें नांव शूर्पारक ( सुपासारखा ) देश असे होते. परंतु यज्ञीय भूमीजवळच असलेल्या गोमांचल पर्वतामुळे या प्रदेशास गोमंतक असें नांव पडले. दुसरीहि एक व्युत्पत्ति या शब्दाला देतात. गौ, म्हणजे बाण त्याचा मार परशुरामाने केला असतां जेथपर्यंत तो बाण पोंचला, तेथें त्या माराचा अंत झाला म्हणून गौमांत=अपभ्रट गोमांतक. कदंब जयकेशीनें आपलें राज्य पुन: चाल्युक्यवंशीय तैलाप राजाकडून मिळवितांच त्याने आपल्या राजधानीस गोपकपट्टन हे नांव दिले त्यावरून गोवे हा शब्द बनला. असे निरनिराळे प्रवाद आज रूढ आहेत. हिंट राजेः-फार प्राचीन काळी गोमंतकांत मौर्य वंशीय राजांची सत्ता चालत असे अशी दंतकथा आहे. त्यांच्यामागून गोमंतक, कदंब वंशीयांच्या हाती गेला. ह्या वंशाचा मूळपुरुष त्रिलोचन किंवा त्रिनेत्र कदंब हा गोमंतकांत इ. स. ११० त राज्य करीत होता असें बकिंघहमनें आपल्या प्रवास वर्णनांत नमूद केलें आहे. ह्या पुरुषापासून षष्टदेव ऊर्फ चट्टदेवापर्यंत म्हणजे इ. स. ४७९ पर्यंत कदंब वंशाची सत्ता गोमंतकांत निरंकुशपणे चालली होती. दरम्यानच्या साडेतीन शतकांच्या अवधींत ह्या वंशांत बरेच राजे प्रख्यात व दिग्विजयी होऊन गेले. की गहल्लदेव व त्याचा पुत्र चट्टदेव ऊर्फ षष्टदेव हे विशेष प्रख्यात होते. षष्टदेवाने लंकाधिपतीला जिंकून त्याला मांडलिक बनविले होते. त्याची राजधानी