पान:गोमंतक परिचय.pdf/248

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ८ वें. बोरकर, वालावलीकर वगैरे ), भारद्वाज गोत्री पाणंदीकर व वसिष्ठ गोत्री साळशीकर नाडकर्णी हेही या देवीचे महाजन आहेत. देवालयाचे आजचे उत्पन्न सुमारे १८१२० हजार रुपये असून १४।१५ हजार रुपये खर्च आहे. त्रिकाल नौबदीचा चौघडा. मुंबईचे दानशूर गृहस्थ कै. नारायणराव दाभोळकर यांनी ठेविला आहे. देवालयांतून देवकृत्य व उत्सव होत नाही, असा एकही महिना सुना जात नसतो. मागें उल्लेखलेला ग्रंथसंग्रहही या देवालयांत आहे. सांगण्यास अत्यानंद वाटतो की, केळोशी येथील मुळची देवालयाची जमीन देवालयाने परत मिळविली आहे. देवालयाला मिळालेली शेवटची जमीन म्हणजे, केळशी येथीलच शांताद्वीप, ऊर्फ देवतेचा जुवा ही होय. इचेच उत्पन्न सुमारे चार हजारांवर येते. श्री मांगिरीश संस्थान, मंगेशीः-पूर्वी हे देवालय सासष्ट प्रांतांतीलच कुशस्थळी (कुठाळ ) या गावांत होते. रायतूरच्या किल्लेदाराच्या बहाद्दरीमुळे त्याचा विध्वंस होतांच, इ. स. १५६८ साली महाजन मंडळीने हे लिंग प्रियोळ गांवांत स्थापन केले. त्यामुळे त्या वाड्यालाच तूर्त मंगेशी हे नांव मिळाले आहे. समोरचा दीपस्तंभ गोव्यांतील एकंदर दीपस्तंभांत उंच व शोभिवंत आहे. देवालयाच्या सभोंवार प्रशस्त अग्रशाळा असून, पुढच्या बाजूस विस्तीर्ण तलावही आहे. वत्स और गोत्राचे स्मात व थोडे वैष्णव असे उभय संप्रदायी गौडसारस्वतब्राह्मण श्री मांगिरीशाचे महाजन आहेत. देवालयांत दरसाल इतके उत्सव व देवकृत्ये होतात की, नवें देवकृत्य ठेवायला जवळ जवळ जागाच नाहीशी झाली आहे. कुंभारजुवें हा गांव देवालयाने विकत घेतला आहे. तूते देवालयाचे उत्पन्न सुमारे २०२५ हजार रूपया असून १७१८ हजार रुपये खर्च होत असतो. येथेही त्रिकाळ नौबदीचा सौगात झडत असतो. मागे उल्लेख केलेला श्री मांगिरीश ग्रंथसंग्रह संस्थानांतूनच चालतो श्री महालक्ष्मी, वांदिवडे:-हे देवालयही सासष्टींतीलच कोलवें या गांवांत मोरे इ. स. १५६७ साली त्याचा उच्छेद होतांच ते बांदिवडे गांवांत नेण्यांत आले कवळे व मंगेशी येथील महाजन मंडळीचे हे उपकुलदैवत (पालवी ) आहे. देवालयाची इमारत अलीकडेच बांधली असून शोभिवंत दिसते. श्री रामनाथ, रामनाथीं (कवळे ):--मागे जुलुमांच्या जंत्रींत ज्याचे त्रोटक वर्णन आले आहे, तोच हा लोटलीचा श्री रामनाथ होय. याच्या विध्वंसाबद्दल हैं। बांधन देण्याचा फैसला न्याय कोर्टाने रायतुरच्या किल्लेदाराविरुद्ध दिला होता. देऊळ बांधल्यामुळे या वाड्यालाच रामनाथी हे अन्वर्थक नांव पडले आहे. कवळे संस्थानच्या उत्तरेस चार पांच मिनिटांच्या अंतरावरच हे आहे. समोरच एक तलाव आहे.