पान:गोमंतक परिचय.pdf/244

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०७ प्रकरण ८ वें. कांठी हे वसले असून सांगे व सावर्डे येथून मडगांवास जाणाऱ्या मोटारीचे हे स्टेशन आहे. येथे जवळच कुशावती नदीला धरण बांधून चांदरपर्यंत पाणी नेणारा पारोडेंचा कालवा नेला आहे. कुडचडें:--हे उपनगर अगदी नवीनच वसले आहे. सांबर्डे स्टेशन याच उपनगरांत आहे. रेल्वे व अघशीनदीचें बंदर या उभयविध सोयींमुळे, हे उपनगर लवकरच एक व्यापारी केंद्र बनेल अशी चिन्हें दिसतात. आजदेखील येथून बराच मोठा व्यापार चालतो. दोन तीन कारखानेही येथे आहेत. सांगें:-कोसेल्याचे हे मुख्य स्थान आहे. पूर्वी हे गांव उतारपेठेचे होते परंतु रेल्वे झाल्यापासून येथील व्यापार मोडला. येथे दोन नद्यांचा संगम झाला असून मध्ये प्रवाहांतच संगमेश्वराचे एक कोरीव देऊळ आहे. . वाटपैः- हे गांव सत्तर कोसेल्याचे मुख्य ठिकाण आहे. केळघाटांत जाणारा रस्ता येथूनच जातो. सांवर्ड:--हा गांव लहानसाच आहे. सांव. स्टेशन हे नांव पडायला हाच गांव कारण झाला. वास्तविक सांवर्डे स्टेशन कुडचडे उपनगरांत आहे. स्टेशनाच्या उत्तरेस अघशी नदी उतरतांच प्रवासी या गांवात पोचतो. येथील सावर्डेकर नाडकर्णी यांचा वाडा जुन्या बांधकामामुळे बराच प्रसिद्ध आहे. गोमंतकांत एवढा प्रचंड वाडा दुसरा नाही. त्यांचे मूळपुरुष विठोबा सरदार हे १८ व्या शतकाच्या मध्यविभागांत रायतुरच्या किल्ल्यावर किल्लेदार होते व त्यांना पोर्तुगीज सरकारनें क्याप्टनचा हुद्दा दिला होता. येथे अघशी नदीवर रेल्वेचा दुमजली पूल सुमारे अर्धा मैल अंतरावर आहे तो प्रेक्षणीय आहे. रायबंदरः--नवीन गोवा शहराचा हा एक भाग आहे. पणजीहून याचा देखावा प्रेक्षणीय दिसतो. शुद्धीचा पहिला बार याच्या जवळच्या चिंबल गांवातच उडाला होता. मिझेरीकोर्दीचे हॉस्पिटल याच उपनगरांत आहे.. देवालये:-पोर्तुगीज पूर्वकालांत गोमंतकांत कोमुनदादीचे प्रस्थ बरेच होते व त्यामुळे गांवगन्ना मोठमोठी देवालये होती. बाटाबाटीच्या काळांत ह्या साऱ्या देवालयांची वातोहात होऊन गेली व ती जुन्या काबिजादीतून नव्या काविजादीत स्थलांतर. पावली. त्यांचे मुळचे अग्रहार, इनामें, दानपत्रं, नेमणुका इत्यादि नष्ट झाली व त्यानां नव्याने पहिले पाढे पढो पंचावन असा क्रम सुरू करावा लागला. तरी देखील आजला. गोमंतकांत प्रेक्षणीय व संपन्न अशी बरीच देवालये आहेत. त्यांतील प्रमुख प्रमुखः : देवालयांची माहिती पुढे देत आहो. श्री सप्तकोटीश्वर, नारवेंः-हे देवालय तूर्त सांखळी कोसेल्यांतील नारवें गांवीं .