पान:गोमंतक परिचय.pdf/243

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय ठाकठीक झाल्या आहेत. गोव्यांतील प्रसिद्ध असा सरमळ्याचा झरा या कसव्याजवळच आहे. येथून उत्तरेस सावंतवाडीपर्यंत व दक्षिणेस म्हापशापर्यंत मोटारीची सोय जाहे. । हळर्णः-कायसुवच्या नदीकाठच्या या गावांत इतिहासप्रसिद्ध असा हळर्णचा किल्ला असून तेथे पूर्वी पोर्तुगीज व वाडीकर भोसले यांच्यामध्ये बरीच युद्धे झाली होती. चिखली व आरोवाः--चिखली, हे लखवादादा लाड यांचे जन्मस्थान होय. आराबो गावांत एक लहानसा किल्ला आहे. इतिहास प्रसिद्ध लखवादादा लाड यांचे वास्तव्य स्थान असा वाडा याच गावांत आहे. प्रसिद्ध आरोबकर देसाई यांचंही निवासस्थान येथेच आहे. चिखली येथे दोन व आरोवा येथे एक अशी तीन लाड घराणी आहेत. केरीः-हा गांव बक्षिबहाद्दर जिवबादादा केरकर यांचे वसतिस्थान होते. अजूनही तेथे त्यांचे वंशज राहतात. पारसें:--हा गांव डॉ. भाऊ दाजी लाड यांच्या घराण्यामुळे व लाड-घराण्याची ग्रामदेवता श्रीभगवती या देवस्थानामुळे प्रसिद्ध आहे. डिचोली:--हा गांव पूर्वी उतारपेठेचा होता. त्याचप्रमाणे एकोणिसाव्या शतकाच्या तिसऱ्या विभागापर्यंत येथे पोर्तुगीज सरकारच्या लष्कराचे ठाणे होते. तूर्त डिचोली कोमाकांचे मुख्य स्थान असल्यामुळेच या गांवाला महत्व आहे. येथे मातीच्या मूर्ति व कुंभारकाम बरेच प्रेक्षणीय होतें. सांखळीः--कोसेल्याचे हे मुख्यस्थान असून पूर्वी येथे बराच मोठा व्यापार चालत होता. एक किल्लाही येथे होता. परंतु आता त्याचा थोडासा भाग मात्र आहे त्यातच सरकारी रेसेबदोरी व जकात नाकें असतें. हरवळेंच्या धबधब्याजवळ जावयाची साय येथूनच होण्याजोगी आहे. श्री. दत्तात्रेयाचे जागृत स्थान व मंदिर सांखळीत आहे. फोडें: हे कोसेल्याचे मुख्यस्थान आहे. इतिहासांत वर्णन केलेला मर्दनगड या गावांतच आहे. श्री. भिषग्वर रामचंद्र पांडुरंग वैद्य यांनी स्थापन केलेले आल्मैद कॉलेज याच गांवांत असल्यामुळे, येथें साऱ्या गोमंतकांतून बरेच विद्यार्थी दरसाल येत असतात. अत्रुज प्रांतांतील सर्व ठिकाणी जाण्यास येथूनच सोय होते. गोमंतकांतील प्रसिद्ध प्रसिद्ध देवालये याच्या आसपासच आहेत. पणजीहून बेळगांवांस जाणारा मोटार येथे स्टेशन करते. विजापूर दरबार, सोंधेकर, मराठे. पोर्तुगीज इत्यादिकांच्या राजकीय घडामोडीचे हे इतिहासप्रसिद्ध स्थान आहे. विजापूरच्या अमलाच्या वेळी बांधलेली सप्फामशीद याच्या जवळच आहे. मर्दनगड किल्ल्याचे बरेच अवशेष अजूनही पहायला मिळतात. मराठ्यांच्या गोमंतकीय प्रांताची हीच राजधानी होता. के:--हेही कोंसेल्याचे व कोमार्काचे मुख्य स्थान आहे. कुशावती नदीच्या