पान:गोमंतक परिचय.pdf/245

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय आहे. अगदी जुन्या काळी तें कदंब राजांचे कुलदैवत होते व विजयनगरच्या अमदानीत त्याचे मूळचे वसतिस्थान में दीपवति बेट ( दिवाडी ) ते त्याला नंदादीपासाठी माधवमंत्र्यांनी सोडले होते. पाद्रींच्या पुंडव्यांत ते देवालय विनाश पावले आणि लिंगाचा उपयोग विहिरीवर फोपाळ्यासाठी ( दोर ओढण्याची तुळई ) होऊ लागला. इ. स. १५४९ त नारायण शेणवी सूर्यराव देसाई यांनी ते लिंग अचानक उचलून रातोरात पळवून भतग्राम प्रांतांतील लाटंबाशैं गांवांत नेऊन ठेविले व पुढे १५६९ त तूर्तच्या जागी त्याची स्थापना केली. इ. स. १६६९ साली क्षत्रीय कुलावंतस श्री शिवाजी महाराजांनी देवालयाचा __जीर्णोद्धार करून आजचे देवालय बांधले व त्याला सातशें होनांची नेमणूक करून दिली होती. परंतु एका दुष्टाने हस्तलाघवाने मूळ सनदेंतील एक शून्य पुसून टाकल्यामुळे, आतां पोर्तुगीज सरकारांतून देवालयाला केवळ १९१ रुपयेच मिळतात. इ. स. १९१० नंतर याचे पूर्वीचे कमानीचे छप्पर, मध्ये भेग आल्यामुळे, मोडण्यांत येऊन कौलारू छप्पर घातले आहे. परंतु जुनी कमान पाडून टाकण्यासच प्रचंड प्रयास पडले, इतकी ती मजवूद होती. येथे दरसाल शिवरात्रीचा उत्सव होतो. पणजीहून नदीमार्गाने नारवें बंदरावर येतांच, श्रीसप्तकोटीश्वराकडे जावयाला सुमारे दोन मैलांचा चांगला रस्ता आहे. याचे महाजन, सूर्यराव सरदेसाई, विश्वासराव देसाई, आमोणकर व दिवाडकर हे नैध्रुव गोत्रीय गौड सारस्वत ब्राम्हण व कांहीं द्रवीड ब्राह्मणही आहेत. श्री शांतादुर्गा संस्थान, कवळे:- गोमंतकांतील कौशिक गोत्रीय गौड सारस्वत ब्राम्हणाचं हे कुलदैवत होय. याचे मूलस्थान सासष्ट प्रांतातील केळोशी हे गांव होते. ३. स. १५६४ साली देवालयाचा विध्वंस करण्यांत आला. तेव्हां महाजन मंडळीनें मूर्ति पळवून साँधेकरांच्या अंत्रुज प्रांतांत नेली. व मोठ्या प्रयासाने महारांकडून थोडीशी जागा मिळवून तेथे तिची स्थापना केली. तेच आजचे कवळे क्षेत्र होय. श्री शाहु महाराजाच मत्री, नारो राम शेणवी, हे या देवीचे महाजन असल्यामुळे, त्यानी इ. स. १७०८ ते १७३८ च्या दरम्यान सांप्रतचें भव्य देवालय बांधून दिले व इ. स. १७३९ त श्री. बाजीराव पेशवे यांकडून कवळे हा गांव देवीस इनाम देवविला. अर्थात् पुनः या देवीची पूजाअर्चा मुळच्या इतमामाने होऊ लागली. या शिवाय ठिकठिकाणच्या महाजन मंडळीनेही शक्त्यनुसार देणग्या, नेमणुका वगैरे देण्याचे अखंड व्रत चालविलेच आहे. देवालयासभोवती भव्य अग्रशाळा असून समोर दीपस्तंभ व तलाव आहे. अग्रशाळापैकी एक अग्रशाळा इतिहासप्रसिद्ध रामचंद्र मल्हार सुखठाणकर यांनी बांधून दिली होती. तूर्त कौशिक गोत्रीयांशिवाय वत्स गोत्री वरदे ( भरणे,