पान:गोमंतक परिचय.pdf/242

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०५ प्रकरण ८ वें. हे शहर रमणीय दिसते. लिसेव सेंत्रालची इमारत, प्रसूतिगृहाची इमारत, मिझोरिकोर्द संस्थेचा बालिकाश्रम, आल्बुकर्कचे स्मारक, वास्को दा गामाचे स्मारक, म्युनिसीपल हाऊस, इत्यादि इमारती प्रेक्षणीय आहेत. परंतु पणजीच्या साऱ्या इमारतींत तेथील चर्चची इमारत जितकी प्रेक्षणीय दिसते, तितकी आणखी कोणचीच दिसत नाही. पोर्तुगीज हिंदुस्थानची राजधानी, गोव्याचे हायकोर्ट व तिसवाडी कोर्माक आणि कोसेल्य याचे हे मुख्य स्थान आहे. गोव्यांतील व्यापाराचें तें मुख्य केंद्र आहे. मडगांवः-जुन्या ऐतिहासिक काळी हे शहर राजधानीचें होते असे सांगतात. लहानसेंच असले तरी ते टुमदार दिसते. विशेषतः, नवा बाजार, म्युनिसिपाटीची इमारत, कार्तेलांमळ नांवाचें विस्तीर्ण मैदान, श्री दामोदर विद्याभुवन इत्यादि भाग मनोरम दिसतात. हे शहर गोव्याच्या व्यापाराचे मुख्य केंद्र बनण्याचा संभव दिसतो. हिंदुसमाजांतील अलीकडच्या बऱ्याच चळवळींमुळे हे शहर प्रसिद्ध आहे. मोटारींची जंगी वाहतुक येथूनच होते. साऱ्या गोमंतकभर येथून मोटारी जात येत असतात. सासष्ट कोमार्काचे व कासेल्याचे हे मुख्य स्थान आहे. म्हापशेः हे शहर देखील लहानसेंच असले तरी, बारदेशच्या संपन्न कोसेल्याचे व कोाकाचे मुख्य स्थान आणि गोव्यांतील प्रमुख उतारपेठ या नात्याने पूर्वी पासून बरेच प्रसिद्ध आहे. गोमंतकाच्या उत्तर विभागाचा व्यापार व रहदारी याच शहरामार्फत चालतात. सारस्वत विद्यालय येथेच आहे. पणजीहून वेतीं वरें या फेरी बोटीनें बेती येथे जातांच म्हापशाला जाणाऱ्या मोटारी हमेश मिळतात गोव्यांतील वैश्य समाजाचे केंद्र याच शहरांत आहे. वास्कोदागामाः--रेल्वेच्या व बंदराच्या सोयीमुळे हे शहर उत्तरोत्तर वाढतच आहे. शहर सुधराई कमिटीच्या योजनेमुळे, प्रशस्त रस्ते, सुंदर इमारती, इत्यादि सोयी या शहरांत वाढल्या आहेत. स्टयाडर्ड ऑइल कंपनी, एशियाटिक पेट्रोलियम कंपनी, बर्मा ऑइल कंपनी यांनी येथे आपापल्या मालाचे सांठे केले आहेत. गोव्याचा परदेशांशी होणारा व्यापार येथूनच होतो. येथील डोंगरांत विपुल पाणी असून वरून दरवरचा देखावा मोठा प्रेक्षणीय दिसतो. जुना किल्ला आतां भंगलेला आहे तरी त्याचे काही अवशेष अजूनही सुंदर दिसतात. हे शहर राजधानीचे करावे असें सरकारने इ. स. १८०३ त ठरविले व एक दोन इमारतीही तेथे बांधल्या होत्या. . पेडणे:--हा गांव कोंसेल्याची राजधानी असून कसब्याचा आहे. प्रसिद्ध धनिक श्री. वासुदेव आत्माराम प्रभु देसाई देशप्रभु यांच्या रहिवासामुळे येथे कित्येक इमारती