पान:गोमंतक परिचय.pdf/241

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय १०४ सोय आहे. कुर्डी गावांत नदीच्या धरणाजवळच एक जुने पण लहानसेंच देवालय असून त्यांत सुंदर सुंदर तीन चार मूर्ति आहेत. त्याहि अभ्यासनीय आहेत. तेथे जाण्यास सांग्यापर्यंत मोटारीची सोय आहे. पुढे मात्र सुमारे चार पांच मैल पायींच जावे लागते. हेमाडबार्श महालांत तांबडी गावांत एक जुने देऊळ आहे, त्यांत तर कोरून तयार केलेला दगडी लांबण दिवा आहे. या देवळाची माहिती देखील संशोधकांनी अजून मिळविली नाही.. जुनें गोवेंः-हे शहर पूर्वी मुसलमानांनी इ. स. १४७९त वसविलें असें इतिहास सांगतो. पुढे इ. स. १५१० त तें पोर्तुगीजानी घेऊन आपली राजधानी केली. विजयानगरचे माधव मंत्री यांनी ब्राह्मणांस दान दिलेली भूमि व स्थापन केलेले माधवतीर्थ ऊर्फ ब्रह्मपुरी, याच शहराच्या विस्तारांत संभवतात. त्याचप्रमाणे कंदबकालीन मांडवी म्हणजे जकातनाही येथेच होते, तेव्हां हे शहर कंदवकालीनच असावे, असें अनुमान क्रमप्राप्त होतें. तूर्त माधवतीर्थाकडे श्रावण सोमवारांची जत्रा भरते. पोर्तुगीजांच्या आगमनकालींच हे शहर भरभराटीत होते. नंतर त्यांनी तेथें, सां कायतान, बों जेजूस, सांत आगुदतीन्य सां फ्रांसीइकु द आसीझ, से पात्रियार्काल, पालासियु द इंकिझिसांव, (धर्म समीक्षण सभेची प्यालेस. कोंकणींत ती " व्हडलें घर" या नावाने ओळखली जात होती.) आर्सेनाल, पालासियु दुझ व्हिजोरेइश् , इत्यादि पुष्कळच इमारती उभारल्या. त्याकाळी गोवा शहरांत सुमारे तीन चार लाख लोकवस्ती होती. शहराचा काही भाग सपाट होता व कांहीं भाग टेकडीवर वसलेला होता, त्यामुळे पोर्तुगीजांना ते आपल्या लिज्बोअ शहरासारखें दिसे. संपन्नता व हे सादृश्य यामुळे 'ज्याने गोवें पाहिले त्याला लिज्बोअ पाहण्याची आवश्यकता नाही” (Quem viu Goa nao tem de ver Lisboa) अशी म्हण तेव्हां रूढ होती. इ. स १७६९ त तथे एक भयंकर सांथ आली व मुख्य मुख्य अधिकाऱ्यांनी आपलें ठाणे तेथून पणजी येथे नेले. आणि पुढे इ. स. १८०३ साली सारीच आफिस तथून निघून हे शहर उध्वस्त झाले. तूर्त तेथे केवळ चार पांच इमारतीच काय त्या सुस्थितीत दिसतात. पैकी सां कायतानची इमारत रोमच्या सेंट पीटरच्या धर्तीवर बांधली असून सुंदर दिसते. बों जेजसच्या कोव्हेंतांत सेंट फ्रान्सिस झेवियरचे शव आहे व सेंट फ्रान्सिस द आसीझच्या कोव्हेंतांत पुष्कळच जुन्या मूर्ति आहेत. पणजी:--हें शहर नवीन-गोवा शहराचा एक भाग आहे. आग्वादच्या उपसागरांतून आत शिरतांच ते दिसू लागते. ते एका डोंगराच्या पायथ्याशी अर्धचंद्राकार वसले आहे. सुंदर इमारती, शोभिवंत रस्ते, नदीची पायघडी, इत्यादि आंगांउपागांमुळे