पान:गोमंतक परिचय.pdf/240

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१०३ प्रकरण ८ वें. स्थितीत तिजवर परक्यांची नजर पडूं नये या हेतूनेच की काय, पणजीच्या बंदराचा मार्ग आड वळणामुळे थोडा धोक्याचा बनला आहे. धबधबेः-दुधसागरच्या धबधव्याचे वर्णन करण्याचा प्रयत्न आम्हाला करावयाचा नाही. लोकांची दृष्ट लागू नये म्हणून हळुवार मनाच्या माता जशा आपल्या कोमल बालकांना नेहेमीं लपविण्याचा विफल प्रयत्न करीत असतात, त्याचप्रमाणे बिचाऱ्या सह्याद्रीनें या आपल्या बालकाला कित्येक वर्षे एका वळणांत लपविलें होतें. पण हिंदुस्थानची सारी संपत्ति उघड्यावर टाकण्याचा विडा उचललेली पाश्चात्य संस्कृति रेलवेच्या रूपाने अवरली व तिनेच आम्हां गोमंतकीयांची ही गुप्त संपत्ति प्रदर्शनांत मांडली. इतकेच नव्हे, तर दुधसागररूपी वालकाला तिने रेल्वे पुलाचा नवा कटिबंधही नजर केला. तेव्हां आतां या संस्कृतीचे आभार मानावे की, तिचा द्वेष करावा हेच कोडे आहे. दुधसागर स्टेशनांतच गाडी भुयारांत प्रवेश करिते. तेथून बाहेर येतों न येतो, इतक्यांतच हा नयनरम्य प्रवाह डावीकडून सुमारे दोनशे मीटरवरून टप्याटप्यांनी उड्या घेत प्रवाशाचे स्वागत करतो. त्याचा तो दुधासारखा शुभ्र प्रवाह व श्रवण मनोहर खळखळाट, आमच्या इंद्रियांच्या आवाक्यांत येतात न येतात, इतक्यांतच पुनः गाडी भुयारांत कोंबली जाते व ही घटना देखील दृष्ट लागेल या भयानेच सह्याद्रीने केली नसेलना असा क्षणभर संशय उत्पन्न होतो. परंतु पाहप्यांकडे जाऊ नको, असे प्रत्यक्षाप्रत्यक्ष बजावले असतांही खेळकर बालक जसा पुनः पुनः त्याच्या भोवती दुरूनच घिरट्या घालीत असतो, तसा दुधसागरही पुढे दोन तीनदां प्रवाशाला जरा लांबूनच दर्शन देत असतो. . दुसरा मनोहर धबधबा म्हणजे हरवळेंचा होय. मांडवीला भेटणाऱ्या सांखळीच्या नदीने, सुमारे २५-३० मीटरच्या उंचीवरून एकदम खाली उडी घेऊन हा धबधबा निर्माण केला आहे. सांखळीहून वाळपैस जाणाऱ्या रस्त्यानें मैल दीड मैल जातांच उजव्या बाजूला, आडवाटेने सुमारे अर्ध्या मैलावर हा धबधवा मिळतो. शेजारीच एक शिवालय असून तेथे शिवरात्रीची जत्रा भरते. त्याचप्रमाणे तेथे जुनी बुद्धकालीन लेणींही आहेत. शहरें व गांवेंः-पुराणवस्तुसंशोधनाच्या दृष्टीने थोरले गोवें हें नामशेष शहर व चंद्रपूर ( कदंबाचंच ) हे दुसरें, ही दोन अभ्यासनीय आहेत. थोरलें गोवें हे पणजीहून अघशी येथे जातांना सात मैलांच्या अंतरावर मिळतें व चंद्रपूर हे तर चांदर हे स्टेशन होय. अजून देखील शोधकांना तेथे जुने शिलालेख सांपडतात. गांवापैकी रिवण येथे बुद्धकालीन खोदकामें दिसतात. तेथे जाण्यास सांवडे स्टेशनावरून मोटारची