पान:गोमंतक परिचय.pdf/23

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण पहिले. . उतार पेठाः-जुन्या काळी सारी वाहतुक बैलांच्या लमाणांनीच होई व त्यामुळे जुन्या रस्त्यांवरच मूळच्या उतार पेठा होत्या. केळघाटाच्या रस्त्यावर सांखळी व डिचोली, म्हापशें, तिनई घाटाच्या रत्यावर उसगांव, खंडेपार, म्हाडदोळ, फोंडे, दुर्भाट, दिगीच्या रस्त्यास सांगें, के, पारोडे, मडगांव, बाळळी, ह्या उतारपेठा होत्या. तेरेखोलच्या खाडीला पेडणेंची उतार पेठ होती; कायसुवच्या खाडीला म्हापशेंची उतार पेठ होती ती अजून भरभराटींतच आहे. बेतुलच्या खाडीला मडगांवची उतार पेठ होती. परंतु अलीकडे रेल्वे झाल्यापासून ह्या सर्व पेठांपैकी केवळ दोनच उतार पेठा टिकल्या. मडगांव हे स्टेशन झाल्यामुळे व म्हापसें हें संपन्न बारदेशची राजधानी असल्यावरून. त्यांतल्या त्यांत म्हापशांपेक्षां मडगांव विशेष भरभराटींत आहे. पणजीचा व्यापार मात्र पूर्ववत् चढताच आहे. नव्या उतार पेठांत मुरगांवजवळ वास्कोदगामा ही एक व सावर्डे, कुडचडे स्टेशनची दुसरी, दिवसें दिवस वाढतच आहेत. सांवडेंच्या पेठेमुळे सांगें, के, पारोडे ह्या पेठा मुळीच बसल्या.