पान:गोमंतक परिचय.pdf/237

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय १०० १९२९ त हे स्थापन केले. हे नवहिंदूंसाठी आहे. 'ग्रंथसंग्रह व फंड वर्गणीही नाही. कारण, सार्वजनिक पैसा म्हणजे विष आहे असे श्री. लंवदे म्हणतात. त्यांनी वर्तमानपत्रांशी पत्रव्यवहार करून वीस नियतकालिके मोफत मिळविली आहेत. गावड्यांना जमवून त्यांना प्रचलित विषयाचे ज्ञान करून देण्यात येत असते.' असें, मंदिराचे सेक्रेटरी, श्री. अनंत कुडईकर यांच्या पत्रावरून समजतें. ___ या शिवाय ज्या संस्थांची नांवें लेखकाला ठाऊक आहेत, पण माहिती मिळाली नाही त्यांचा नामनिर्देश पुढे केला आहे. साऱ्या संस्थांतून वाचन मोफतच असते. आणि कमीत कमी ४००।४५० ग्रंथ तरी प्रत्येक संस्थेत असतात. दैवज्ञब्राह्मण समाज, मडगांव; मुरगांव साहित्य सेवा संघ, वास्कोदागाम; गोरक्षण ज्ञानप्रसारक संघ, मुरगांव ( हारबर ); श्री रवळनाथ वाचनमंदिर, पेडणे; शीलोन्नतिसमाज, पेडणे; श्री हनुमानवाचनालय, मोर्जी; श्री महालक्ष्मी वाचनमंदिर, मांद्रे श्री रामवाचनालय, मांद्रे श्री भगवति मोफत वाचनालय, पासे; श्री महात्मा वाचनमंदिर, कोरेगांव ( पेडणें ); लोकसेवक समाज, हरंबल; श्री मुरलीधर वाचनालय, सांखळी; मोफत वाचनालय, सत्तर; श्री शांतादुर्गा ग्रंथसंग्रह, श्रीक्षेत्र कवळे ( ४५० ग्रंथ आहेत ); महाराष्ट्रसारस्वत वाचनालय, फोंडे; श्री सरस्वती वाचनमंदिर आणि मराठी ग्रंथसंग्रहालय, कवळे बालसंस्था वाचनमीदर, म्हाडदोळ; श्री मांगिरीश वाचनालय, श्रीक्षेत्र मंगेशी ( सुमारे सात आठशे ग्रंथ आहेत. व कित्येक नियतकालिके येत असतात.) श्री महालक्ष्मी वाचनमंदिर, मंगेशीं; श्री विठ्ठल वाचनमंदिर, कुंडई; श्री सरस्वती वाचनमंदिर, मडकई; श्री कामाक्षा वाचनमंदिर, शिरोडे-गोवा; श्री भूमिपुरुष वाचनालय, फोंडें; श्री सरस्वती वाचनालय, दाभाळ ( किर्लपाल, सांगें ); श्री महालक्ष्मी वाचनालय, नेतुर्ली ( सांगें); बालोन्नतिसमाज, के; श्री शारदासेवकमंडळ, फातर्फे ( बाळळी ); सरस्वती सेवक समाज, काणकोण. यांपैकी बऱ्याच संस्था सरकारांत रजिस्टर झाल्या आहेत. सर्वांचे ज्ञानप्रसाराचें कार्य मोफतच चालते. संस्थेची मालकी व खर्च चालविण्यापुरतीच ती ज्ञाति किंवा संघनिष्ट असते.