पान:गोमंतक परिचय.pdf/236

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ७ वें. समाजांतील चळवळींकडे ख्रिस्ती समाजाचे व सरकारचे लक्ष खेचण्यास बरीच मदत झाली आहे. राष्ट्रीय वाचनमंदीर, डिचोली:-इ. स. १९१३ सालींच या मंदिराचीही सुरवात झाली. डिचोलीच्या विद्यावर्धक मंडळानेच ते चालविले असल्याने, त्याच्याच इमारतींत मंदिराला जागा मिळाली आहे. आजला त्यांत सातशांवर ग्रंथ असून १३ नियतकालिके येतात. ___ श्री लक्ष्मी सरस्वती वाचनमंदीर, कुंकळी ( सांवरकट ):-इ. स. १९१५ साली स्थापना झाली. रा. रा. नारायण केशव केणी यांनी स्वतःच्या खर्चाने बांधून दिलेल्या इमारतीत मंदीर चालतें, मंदिराच्या वाढदिवसाप्रीत्यर्थ तीन दिवस उत्सव होत असतो. ग्रंथसंख्या चारशे आहे. काही नियतकालिकेही येतात. श्रीवेताळ प्रासादिक वाचन मंदीर, असोळणे:--मंदिराची स्थापना १९१७ साली झाली. ग्रंथसंग्रह निवडक असून तूर्त सुमारे दोन हजारांवर त्याची संख्या आहे. १५।२० नियतकालिके येत असतात. ता. २१ मेला वाढदिवसाप्रीत्यर्थ होणाऱ्या उत्सवांत दोन तीन व्याख्याने दरसाल होत असतात. दैवज्ञब्राह्मण समाज मोफत वाचनालय, म्हापशेः--दैवज्ञ ब्राह्मणसमाजाने १९१९ साली या संस्थेची सुरुवात केली. सुमारे २ हजारांवर ग्रंथसंख्या असून नियतकालिके २५ येतात. व वाचकांची रोजची संख्या २०१२५ असते. वाचनालयासाठी पांच हजार रुपये किंमतीची इमारत खरेदी केली आहे. श्री शांतादुर्गा वाचनमंदीर, कुंकळी (म्हाड्डेकटें ):-याची स्थापना वास्तविक १९०८ सालीं श्रीयुत अनंत नारायण पै वेर्णेकर यांनी परिश्रम घेऊन केली होती. परंतु पुढे तिचे काम बरेंच मंदावले होते. १९२८ त तिचे पुनरुज्जीवन होनी ज्ञानप्रसारक संघ, कुंकळ्ळी या संस्थेतर्फ तूत चालत आहे. संघ एक मराठी शाळाही चालवितो. तूर्त मंदिरांत ३५० निवडक ग्रंथ असून २० नियतकालिके येतात दरसाल पांच सात उत्सव व्याख्यानांसहित साजरे करण्यात येतात. श्री शांतादुर्गा वाचनमंदिर, वेरें (रेइज्मागुश ):--हें मंदीर गौडसारस्वत ब्राह्मणांचे आहे. १९२८ साली त्याची स्थापना झाली. तूत सुमारे ८०० ग्रंथ असून १४ नियतकालिके येत असतात. नवहिंदु वाचनालय, चिंबल:--रा. रा. रामचंद्र नारायण प्रभु लंवदे यांनी