पान:गोमंतक परिचय.pdf/235

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय सारस्वत ब्राह्मण समाज, मडगांवः-इ. स. १९१३ साली केवळ नऊ तरुणांनी ही संस्था स्थापन केली. कळकळीचा व मेहनती चालकवर्ग तिला लाभल्यामुळे, गोमंतकांतील संस्थांत हिचा दर्जा पहिल्या प्रतीचा झाला आहे. वाढदिवसाप्रीत्यर्थ गुढी पाडव्याकडे होणाऱ्या बऱ्याच मोठ्या व्याख्यानमालेस प्रसिद्ध महाराष्ट्रीय वक्ते आमंत्रून, महाराष्ट्राचे लक्ष्य गोमंतकाकडे खेचून घेण्याचे महत्वाचे कार्य याच संस्थेने प्रथम सुरू केले. मडगांवच्या आधुनिक इतिहासांत समाजाचे नांव चिरस्थायी झालेले आहे. तूते सुमारे सात हजारांजवळ ग्रंथसंख्या असून, ३०।३५ नियतकालिके येत असतात. रोजची वाचकांची संख्या शंभराच्या आंत बाहेर असते. आजवर सुमारे १८ हजार रुपये खर्चुन पोष्ट ऑफिसाजवळच्या सरकारने दिलेल्या मध्यवर्ति जागेवर संस्थेची इमारत उभारली आहे. अजून तिचे काम पुरें झाले नाही. व्याख्यानमालेशिवाय इतरही बरेच समारंभ या संस्थेमार्फत होत असतात. तूर्त तरी ती गौड सारस्वत ब्राह्मणांचीच आहे. ग्रंथसंख्येच्या मानाने गोमंतकीय मराठी वाचनमंदिरांत हिचा नंबर पहिला लागतो. वाचनालय-संग्रहालय सर्वत्रांस मोफत आहे. श्री दामोदर वाचनमंदिर, मडगांवः--मडगांवच्या " श्री. दामोदर विद्याभुवन” नांवाच्या भव्य इमारतीच्या काही भागांत तूर्त मंदीर चालतें. सुमारे तीन हजार ग्रंथसंख्या असून २५-३० नियतकालिके येत असतात. रोजची वाचकांची संख्या सुमारे ५०-६० असते. दरसाल शारदोत्सवांत तीन चार दिवस व्याख्यानमाला चालत असून महाराष्ट्रीय वक्त्यांकडूनही बरीच पुष्प गुंफली गेली आहेत. त्यामुळे महाराष्ट्राचे लक्ष्य गोमंतकाकडे लागायला या संस्थेनेही बरीच मदत केली आहे. श्री सरस्वतीमंदिर, पणजी:--माजी हिंदुपुस्तकालयांतून गोवा-हिंदु क्लबांत आलेले ग्रंथ त्या संस्थेच्या अवतारसमाप्तीनंतर मंदिराला मिळाले. इ. स. १९१३ साली विजयादशमीच्या मुहूतावर मंदिराची स्थापना झाली. सुमारे दोन हजार रुपये किंमतीची जमीन इमारतीसाठी खरेदी करण्यांत आली आहे. स्थायिक फंड अडीच हजार आहे. पांच हजारांवर उपयुक्त ग्रंथसंख्या असन ४० नियत कालिके येत असतात. रोजची वाचकांची संख्या सव्वाशांजवळ असते. वाचकांच्या संख्येच्या मानाने ही संस्था अग्रमानाची आहे. स्थापनेच्या दिवशी एकाद्या वाङ्मयभक्ताचे व्याख्यान होत असते. उल्लेखित श्री महालक्ष्मी प्रासादिक हिंदुवाचन मंदीर व हे मंदीर, अशा या उभय संस्था राजधानीत चालत असल्यामुळे, हिंदु