पान:गोमंतक परिचय.pdf/234

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ७ वें. श्री महालक्ष्मी प्रासादिक हिंदु वाचनमंदीर, पणजी:-चालकांकडे मागविलेली माहिती न मिळाल्यामुळे केवळ १९१३ सालच्या रिपोर्टावरच भिस्त ठेवावी लागत आहे. इ. स. १९०७ च्या जानेवारीत या संस्थेची स्थापना झाली. ही संस्था नापित वर्गाची आहे. रिपोर्टाच्या सालीच तीत २ हजारावर ग्रंथ असून ५८ नियतकालिके येत होती. आजला संस्थेला स्वतःची इमारतही आहे. वाचकांना भाड्याने घरी नेण्यास पुस्तकें देण्याचा स्तुत्य उपक्रम याच संस्थेने केला. रिपोर्टाच्या सालींच शिशीरव्याख्यान माला सुरू झाली होती, परंतु आज ती बंद पडली आहे. मागासल्या समजल्या जाणाऱ्या समाजाने ही संस्था चालविली असून पुस्तकें भाड्याने देण्याच्या बाबतीत इतरांनी तिचे अनुकरण केले हे या समाजाला भूषणीय आहे. , सारस्वत विद्यालय वाचनमंदीर, म्हापशे:--इ. स. १९०७ साली म्हापशे येथील सारस्वत ब्राह्मण समाजाने स्थापन केलेले हे वाचनमंदीर इ. स. १९२० सालीं सारस्वत विद्यालयांत नेण्यात आले. दीड हजार उपयुक्त ग्रंथ त्यांत असून २७ नियतकालिके येत असतात. रोजची वाचकांची संख्या सुमारे ३०३५ असते. ही संस्था गौडसारस्वत ब्राह्मण समाजाची असून आजवर चांगली चालत आहे. दरसाल श्री. सरस्वत्युत्सवांत तीनचार दिवस व्याख्यानमाला गुंफण्यांत येत असते. श्रीदुर्गा वाचनमंदीर, म्हापशे:--म्हापशे येथील वैश्य समाजाने स्थापन केलेल्या ज्ञानप्रसारक संघामार्फत इ. स. १९०८ साली हे मंदीर सुरू झाले. सुमारे एक हजार ग्रंथ मंदिरांत तूर्त आहेत. नियतकालिकें २३ येत असून रोजची वाचकांची संख्या सुमारे ३०।३५ असते. दरसाल तीन चार उत्सव होत असून शारदोत्सवानिमित्त दोन तीन दिवस व्याख्यानेही होत असतात. श्री शांतादुर्गा वाचनमंदीर, कुंभारजुवें--इ. स. १९१० साली मंदिराची स्थापना झाली. श्री. शारदा विद्यालयाची आधारभूत मंडळीच या मंतिराचे सभासद आहेत म्हटले तरी चालेल. तूत ग्रंथसंख्या १५०० असून १३ नियतकालिके येत असतात. वाढदिवसाप्रीत्यर्थ श्रीशारदोत्सवांत दरसाल दोन तीन दिवस व्याख्यानमाला चालते. . श्री शारदा वाचनमंदीर, रायबंदरः-इ. स. १९११ साली स्थापन झालेल्या या मंदिरांत तूर्त एक हजारावर ग्रंथसंख्या असून बरीच नियतकालिकेंही येत असतात. स्थायिक फंड पांचशे रुपयांचा असून तो व्याजी लावला आहे. समयानुसार व्याख्यानेही होत असतात... 10