पान:गोमंतक परिचय.pdf/233

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय ९६ लग्न" गोंयकाराचो मुंबईकार, व “ गोंयकारांची गोंयाभायलीं वसणूक " इ. या तीन सुंदर पुस्तकांशिवाय व “मजी बा खें गेली " " वास शणैली पोपाय” दाम्मामालों पणस " " गोंयची बुट्टी” या प्रतिभावान व सुंदर लेखांशिवाय कोंकणींत ग्रंथरचना करण्याचे नांव घेण्याजोगे प्रयत्न इकडे मुळीच झाले नाहीत. वाचनमंदिरें इत्यादि संस्था:-यद्विषयक प्रयत्नाला रीतसर सुरुवात केव्हां झाली तें सांगणें साधनाभावी आम्हांला शक्य नाही. परंतु गोमंतकीय वाचनमंदिरांचा आद्य पूर्वज म्हणजे पणजीचें "हिंदुपुस्तकालय'च असावें असें त्याला वाटते. त्याचप्रमाणे १८९९ सालच्या सुमारास सांबर्डे येथें प्रस्तुत लेखकाच्या घरी श्री. शांतादुर्गा वाचनालय या नावाने एक संस्था थोडा काळ चालली होती अशीही आठवण आहे. त्या सुमारास गोमंतकांत इतरत्रही तशीच वाचन मंदिरें स्थापन झाली असल्याशिवाय हे वाचनमंदीर स्थापन झाले नसावें, एवढाच कयास यावरून निघतो. पणजी येथें जी सरकारी लायब्ररी चालू आहे, ती इ. स १८१७ साली सुरू झाली होती खरी परंतु अजूनही तिच्यांत मराठी ग्रंथांना स्थान नाही. गेल्या शतकांत हिंदुलोकांचा प्रवेश पोर्तुगीज वाङ्मयांत मुळीच झाला नव्हता म्हटले तरी चालेल, इतके त्यांचे पोर्तुगीज भाषेतील अज्ञान मोठे होते. अर्थात् वाचनमंदिरांचा प्रयत्न हा केवळ हिंदूंचा स्वतःचाच ठरतो. गोमंतकीय वाचनमंदिरांचा एक मोठा विशेष म्हणजे, ती मेंबरांनांच खुली नसून सर्वांना मोफत असतात हाच होय. विस्तारभयामुळे या संस्थाचा अल्प परिचव करून आपण पुढे जाऊं.. गोवा-हिंदु-क्लबः--ही संस्था उपरोक्त हिंदु पुस्तकालयाच्याच जागेत इ. स. १९०६ च्या १२ मार्च रोजी डॉ. पु. वा. शिरगांवकर यांच्या चिकाटीच्या प्रयत्नांनी जन्म पावली. परंतु अनेक कारणांमुळे तिला स्थैर्य न लाभतां इ. स. १९०७ च्या सुमारासच ती बंद पडली. र याच वेळी पुनः गोमंतकांत जिकडे तिकडे वाचनमदिरांचा पाऊसच पडला होता. परंतु श्रावणझडीमागून जसा आश्विन मास येतो, तसाच हा पाऊसही उघाडी देऊन विराम पावला. गोमंतकांत तूर्त चालू असलेल्या एकंदर वाचनमंदिरांची त्रोटक माहिती देण्याचा आमचा इरादा होता. पण कित्येक ठिकाणी माहिती मागविली असतांही मिळाली नाही आणि अगदी एकीकडच्या अशा असोळड्यासारख्या गांवांत लेखकाचे वास्तव्य असल्यामुळे, इतरत्र उपलब्ध होऊ शकणारी साधनेही त्याला भरपूर मिळू शकली नाहीत. अर्थात्च हा इरादा पूर्णपणे तडीस न गेल्याबद्दल दिलगिरी वाटते...