पान:गोमंतक परिचय.pdf/232

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ७ वें. आहेत. त्यांनी ते १९२१ साली सुरू केले व आजवर चालविले आहे. स्थलसंकोचामुळे त्याचे काम जसें चालावे तसे चालत नसले तरी बरीच उपयुक्त माहिती त्यांतून नेहमी प्रसिद्ध होत असते. आणि तें चालविण्यांत संपादकांनी ज्येष्ट बंधूवरही ताण केली आहे. नापितोदयः--हें मासिक नापित समाजाच्या उन्नतीसाठी नापित समाजाने पणजी येथे १९२१ साली सुरू केले व कांहीं अंकांनंतर ते बंद पडले. ज्ञातीची सेवा तें यथाशक्ति बजावित होतें.. -हिंदुः-हें वर्तमानपत्र महाराष्ट्रीयांच्या परिचयाचेच आहे. श्री. जयवंत श्रीनिवास सुकेरकर यांनी ते इ. स. साली मडगांव मुक्कामी सुरू केले. त्याचे संपादकीय स्थान श्री. दत्तात्रय व्यंकटेश पैयांच्याकडे असून त्याचा लेखक वर्ग संशोधक वुद्धीचा व देशाभिमानी वर्गातील आहे. आंखलेलें धोरण चिकाटीने, धडाडीने व स्वार्थत्यापूर्वक पुढे चालविण्याचा गुण जो संपादकांत दिसून येतो त्याबद्दल कोणालाही आदरच वाटेल. गोमंतकीय चळवळीत हिंदूने आपल्या प्रयत्नाने स्वतःची जी जागा मुक्रर केली आहे, ती पाहुन त्याचे कौतुक करावेसे वाटते. गामाचा चतुःशतसांवरिक उत्सव झाल्यावेळी हिंदूतून प्रसिद्ध झालेल्या लेखांबद्दल हिंदूवर खटला होऊन शिक्षाही झाली होती. मराठी नियतकालिकांत 'हिंदू' चे कार्य स्वतंत्रपणाने उल्लेख करण्यासारखें भरीव आहे. या खेरीज लहानपणी ज्ञानांजन व श्रीखंड ही दोन नियतकालिके लेखकानें पाहिल्याचे आठवते. परंतु त्यांची माहिती मिळत नसल्यामुळे त्याचा केवळ नामनिर्देशच करून मराठी वाङ्मयविषयक प्रयत्नांचें हें लांबलेले दिग्दर्शन आटोपते घेऊ. - आणि तसें तें घेताना एका गोष्टीकडे मात्र आमच्या वाचकवर्गाचें लक्ष्य आम्ही वेधू इच्छितो. व ती हीच की, या प्रयत्नांत काव्यरचना, ग्रंथलेखन किंवा वृत्तपत्रप्रकाशन यापैकी कोणत्याही बाजूने पाहिल्यास गोमंतकाने मराठी भाषेचे ऋण यथाशक्ति व अखंड फेडलेले या विवेचनावरून दिसून येते. प्रतिकूल परिस्थिति. कोंकणीचा अभिमान, महाराष्ट्रीयांची उपेक्षा किंवा साधनाभावामुळे. आधुनिक अभियुक्त मराठीचे तुटक ज्ञान कशाचीच अडचण त्यांना या ऋणविमोचनांत अडवं शकली नाही. दुसरी महत्वाची गोष्ट ही की, निदान चार शतकांच्या या दीर्घ कालावधीत आमचे सन्मान्य मित्र श्री. वामनराव वर्दै वालावलीकर यांनी लिहिलेल्या " मोगाचें