पान:गोमंतक परिचय.pdf/231

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय इश्त्रुक्सांव एँ गोअ. (गोमांतकांत शिक्षण प्रसार करणारी मंडळी) या संस्थेचे मुखपत्र या नात्याने त्याचा जन्म झाला. हे पाक्षिक स्वरूपांतच प्रसिद्ध होई व प्राचीप्रभेची पुरवणी म्हणून ते सरकारांत नोंदले गेले होते. जुगार, मद्यपान इत्यादि विषयांवर यांत लेख येत असत. इ. स. १९२१ साली ते बंद पडले. स्वयंसेवकः--हें त्रैमासिक देमांदमहात्म्याचे कर्ते, श्री विनायकराव प्रियोळकर यांनी १९१५ साली फोंडे येथे काढले. प्रारंभी तें के येथील भारताची पुरवणी म्हणून ३ वर्षे चालले. व इ. स. १९१८ साली त्याचे प्रसिद्धीकरण फोडे येथे होऊ लागून १९२६ साली ते बंद पडले. यांत बरेच महाराष्ट्रीय लेखकही लिहित असत. गोमंतकांतील चांगल्याच नियतकालिकांपैकी तें एक होते. याच मासिकांतून देमांदमहात्य अवतरले होते. यांतील काही लेख बरेच उच्च दर्जाचे असत. हल्लीच तें - साप्ताहिक स्वरूपांत पुनः निघाले आहे. - अ पात्रियः--' स्वदेश' या पोर्तुगीज नांवाचे हे पत्र, पोर्तुगीज व मराठी स्वरूपांत कै. रामचंद्र मंगेशराव देशपांडे कांहीं लूझोइंडियनांच्या मदतीने चालवित होते. १९१८ च साली ते बंद पडले. यांतील लेख हिंदूंच्या हितास फारसे पोषक नसत. ___गायक मित्र:--हे मासिक गोमंतकीय गायक समाजांतील व्यक्तीनी आपल्या ज्ञातीच्या उन्नतीसाठी फोडें येथे काढले होते आणि ते भारताची पुरवणी म्हणून प्रसिद्ध होत असे. १९१८ च्या जुलईत तें सुरू झालें व १९१९ त कांहीं अंक येऊन बंद पडले. नवजीवनः हे नियतकालिक इ. स. १९२० साली श्री. जनार्दन नारायण पै अस्नोडकर यांनी साप्ताहिक स्वरूपांत पणजी येथे सुरू केले. व तें १९२१ सालापर्यंत चालविले. त्या साली त्याने मासिकाचे रूप घेऊन काही काळ ते चाललें. यांतील लेख साधारण बऱ्यापैकी असत. प्रगतिः--हें वर्तमानपत्र गायक समाजांतील काही तरुणांनी इ. स. १९२० साली पणजी येथे सुरू केलें व इ. स. १९२१ साली तें बंद पडले. भारतोदयः--भारताची पुरवणी या नात्यानेच हे मासिक निघत असे. इ. स. १९२१ त याचा जन्म झाला व थोड्यांच अंकांनंतर ते बंद पडले. भारतमित्र:--हे मासिक लोकमित्राचे भावंड असून त्याच धनंजय छापखान्यांत प्रसिद्ध होत असते. रिवणचे श्री. नारायण भास्कर नाईक हे याचे संपादक