पान:गोमंतक परिचय.pdf/230

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

. प्रकरण ७ वें. होती. इ. स. १९१३ सालापासून तो १९१७ पर्यंत हे वर्तमानपत्र चाललें, दरम्यान डॉक्टर साहेबांच्या धोरणाशी न जुळल्यामुळे उपरोक्त लेखक मंडळी १९१३ सालींच त्याला सांडून गेली. तरीपण डाक्टरसाहेब इहलोकांत होते तोवर हे वर्तमानपत्र' । त्यांनी चालविले. हे यांत जो पोर्तुगीज विभाग येत होता त्यांत इ.स. १९१३ साली श्री. हेगडे देसाई लिहीत असत. १९१७ साली ते बंद पडले. भारतः-प्रभाताला सोडून निघालेल्या लेखकांनी हे वर्तमानपत्र १९१३सालीं श्री. गोविंद पुंडलीक हेगडे देसाई यांच्या संपादकीयत्वाखाली काढले.श्री. हेगडे देसाई यांकडे पोर्तुगीज विभाग होता. इ. स १९१४ साली हेगडे देसाई यांच्या कडून श्री. दत्ताराम जगन्नाथ बोरकर शिवाय इतर मंडळी फुटली व वर्तमानपत्र हेगडे देसाई याच्या हाती संपूर्णत्वाने आले. त्यानी १९१७ पर्यंत तें चालविले व पुढे १९२१ सालपर्यंत तें बंद पडले. दरम्यानच्या कालांत श्री. दत्ताराम जगन्नाथ बोरकर यांचा १९१४ साली बंडवाल्यांनी अमानुषपणे खून केला. तोवर या वर्तमानपत्राची पोर्तुगीज व मराठी बाजू सारख्याच दर्जाची राहिली होती. परंतु पुढे श्रीयुत हेगडे देसाई यानां उभय विभाग झेपेनासे झाल्याने त्यांतील मराठी विभाग नवशिक्यांच्या हाती गेला.. ह्या नियतकालिकानें स्थलांतर करून के येथे आपले पुनरुज्जीवन केले ते आजवर तेथेच चालत आहे भारताचा पोर्तुगीज विभाग कसलेल्या लेखकांच्या हाती असून, मराठी विभाग नवथरांच्या हातींच आहे. त्यामुळे नवे नवे लेखक तयार करण्याच्या दृष्टीने मराठी बाजूचा गोमंतकाला उत्कृष्ट उपयोग होत आहे. पोर्तुगीज सरकारने या पत्रावर बरीच मेहेरनजर ठेविली आहे. सुमारे २५ खटले त्यावर झाले असतील. तरीपण केवळ दोन की तीनच खटल्यांत त्याला आजवर शिक्षा झाली आहे. हिंदुमतः-हें वर्तमानपत्र पोर्तुगीज-मराठीच होते. श्री. शिवराम बळवंतराव देशपांडे यांनी ते पणजी येथे सुरू केले. काही काळ श्री. हेगडे देसाई यांत पोर्तुगीज विभाग लिहित असत. गौडसारस्वत ब्राह्मण समाजांत त्या काळी चालू असलेल्या एकीकरणाची विरुद्ध बाजू याच पत्राने उचलून धरली होती. पब्लिक वर्क्सच्या कारभारावर काही टीका केल्यामुळे सरकारने या पत्रावर खटला करून संपादकाला शिक्षाही देवविली होती. इ. स. १९१६ साली ते बंद पडले. विद्याप्रसारः-श्रीयुत रामचंद्र पांडुरंग वैद्य ऊर्फ दादासाहेब वैद्यांच्या अखंड उद्योगाचंच हे वर्तमानपत्रही एक अंग होते. इ.स. १९१५ साली ते श्री. वैद्य व केरकर यांच्या संपादकीयत्वाखाली फो. येथे निघाले. मागें उल्लेखिलेल्या लीग द प्रोपागांद द