पान:गोमंतक परिचय.pdf/229

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय होतें. “ सखिरात्र दिवस रडवि मज हि सवत गुडगुडी " "खरे सांगा तेथें अनुचित असे काय घडले" इत्यादि कविता फारच बहारीच्या होत्या. इ. स. १९०८ साली ते बंद पडले. चित्ताकर्षणः-हें मासिक निर्णयसागरांत छापून पणजी येथे श्री. शिवराम चळवंत राव देशपांडे हे इ. स.१९०६ सालापासून काढीत असत. मनोरंजन हाच त्याचा प्रधान हेतु होता. श्री. कारापुरकर यांची “ मालिनी" कादंबरी व कै. जिवाजी दत्त महात्मे यांची 'स्वदेशी चाकू' ही छोटेखानी कादंबरी याच मासिकातर्फे प्रसिद्ध झाल्या होत्या. दोनच वर्षांनी ते बंद झाले. प्राचीप्रभा (A Luz de Oriente):-हे पोर्तुगीज मासिक श्री. रामचंद्र पांडुरंग वैद्य यांनी १९०९ साली फो. येथे सुरू केले व १९१४ साली तें बंद झाले. यांत येथील व पोर्तुगाल मधील लेखकांचे भारदस्त लेख येत असत. प्रो० गोळ्यांच्या "हिंदुधर्म आणि सुधारणा" या सुप्रसिद्ध ग्रंथाचे पोर्तुगीज भाषांतर श्री.सीताराम विश्वंभर केरकर यांनी यांतू· नच प्रसिद्ध केले आहे. श्री. दादासाहेब वैद्यांच्या नावाने जरी हे निघत होते तरी सारी संपादकीय जबाबदारी श्री. केरकर हेच संभाळीत होते. पोर्तुगीजानां हिंदी संस्कृतीची ओळख करून देणे हे या मासिकाचे ध्येय होते व तें त्याने शेवटपर्यंत उत्तम रीतीनें पाळले. वास्तविक याची हकीकत पोर्तुगीज वृत्तपत्रांतून द्यावयाची पण प्राचीप्रभेला मराठी अपत्ये पुष्कळच झाली होती. त्यामुळे तिची हकीकत येथे देण्यात येत आहे. ह्याच नावाने श्री. वैद्य मराठीही मासिक चालवित होते. व त्याच्या संपादकाच्या जागी श्रीमति सौ. सरस्वतीबाई वैद्य यांचे नांव झळकत होते. मराठी मासिकाचा हेतू जरी स्त्री शिक्षणाचा होता तरी श्री द. वि. आपटे, कै. विश्वनाथ रा. राजवाडे यांचे इतिहास, व्याकरण, इत्यादि गहन विषयांवरील लेखही यांत येतच असत. इ. स. १९२६ साली तें साप्ताहिक स्वरूपांत प्रसिद्ध होऊं लागून बंद पडले. । हळदकुंकूः–हें मासिक श्रीमती. सौ. सरूबाई वैद्य यांनी फोंडे येथे १९१० साली सुरू केले. हे आमूलाग्र स्त्रियांकरतांच होते. दोन वर्षांनी तें बंद पडलें. प्रभातः-रिपब्लिकच्या स्थापनेनंतर हिंदुसमाजांत उडालेल्या खळवळीच्या पोटीं या साप्ताहिकाचा जन्म झाला होता. याचे संपादक प. वा. सन्मान्य डाक्टर पुरुषोत्तम बामन शिरगांवकर हे होते. १९१३ साली हे जन्म पावलें. प. वा. दत्ताराम ज. बोरकर. श्री. करंडे शास्त्री, श्री. शांबाराव सर देसाई, इत्यादि कसलेल्या लेखकांची याला जोड