पान:गोमंतक परिचय.pdf/22

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय दोनापावल अशा सहिसेस असून त्या हरवक्त फे-या करतात. मोटारची भरती होण्याचीच कायती त्यामध्ये खोटी होते. म्हापसेंहून वेरें, बेती, हळदोणे, डिचोली, कोलवाळ, हणजुण, हडफडे इत्यादि सर्व ठिकाणी, साऱ्या दिवसभर मोटारीच्या फेऱ्या होतात. त्याचप्रमाणे मडगांवांतून, फोंड्याला जाण्यासाठी रासय बंदरांत, कुठाळ, मुरगांव, कुंकळ्ळी, असोळणे, चांदर, के, सांगें, जांबावली, काणकोण वगैरे ठिकाणी मोटारी सारख्या येरझारा, करीत असतात. त्यांच्या भाड्याचे दर जरी म्युनिसिपालटीने ठरवून दिले आहेत तरी व्यवहारांत त्या दरांपेक्षां पुष्कळच कमी दराने ही वाहतुक होत असून, एकाद दुसरी सर्व्हिस सोडली तर इतर ठिकाणी त्या दरांत नेहमीं फेरबदल होत असतो. त्याचप्रमाणे कोलवाळच्या पलीकडील धारगळ बंदरांतून पेडणेपर्यंत मोटारी चालत असून पेडण्याहून सावंतवाडी वेंगुर्ल्यापर्यंत जाता येते. मडगांवहन पणजी येथे जावयाला कुठाळच्या मोटारीतून जाऊन तेथें अघशी नदी उतरून पुनः अघशीहून पणजीच्या मोटारीत बसावे लागते. सामान्यतः माणसी एकंदर भाडे १ रु. १ आणा पडते. पण टुरिंग सीटला हे भाडे १ रु. ५ आणे आहे. पणजीहून म्हापशाला जावयाला तर उतरतांच माणसी ६ आणे भाड्याने तेथें पोंचवितात. बेतीतून म्हापशें, डिचोली, सांखळी व वाळपै अशी पोस्टल मोटार सहिस आहे. तिला वाळपैपर्यंत माणशी १ रुपया भाडे पडतें.. बेळगांव लाइन:-पणजीपासून बेळगांवला जायला सकाळी दहाला "चव्हाण वदर्स'ची लॉरी सुटते ती वाटेंत मंगेशी, म्हाडदोळ, फोंडे, खंडेपार, येथें उतारू घेत लोंडा, खानापूर मार्गाने संध्याकाळी सुमारे ४॥ ला बेळगांवीं पोंचते. कारवारची सर्विस:--मडगांवांतून सकाळी ९॥ ला व संध्याकाळी ७ ला अशा दोनदा मोटारी कारवारला जाण्यासाटीं निघतात त्या कारवारला असतो सुमारे दुपारी दोन व रात्री बाराला पोचतात. परंतु मध्यंतरीं तर्पणच्या नदी गाळजीवागच्या बंदरापर्यंत सुमारे दोन मैल खटाऱ्यांतून जावे लागतें जो चढाओढीमुळे १२ आणे आहे. गोव्यांतून इतर प्रांताशी दळणवळण ठेवणारे मुख्य असे हेच दोन मोटारींचें रस्ते आहेत.