पान:गोमंतक परिचय.pdf/228

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ७ वें. न्यायचक्षुः–हें मासिक श्री. खाडये व कोळवाळकर ह्यांनी पणजी येथेच इ. स. १८९० साली सुरू केले व त्यांत ४ थ्या अंकापासून पोतुगीज विभागही सुरू केला. पण हेही एकाच वर्षांच्या आतच बंद पडलें. गाझेत द पे ः-(पेडणें ग्याझेट ) श्री. रामचंद्र पुरुषोत्तम देसाई देशप्रभू ह्यांनी पेडणे येथे ता. २७ मार्च इ. स. १८९३ रोजी हे मराठी व पोर्तुगीज पाक्षिक . सुरू करून एक वर्ष चालविलें. कालिकादर्शनः-हें मासिक १८९८ साली श्री. आर. पी. शेट नागवेकर यांनी पणजी येथे काढिले. परंतु यालाही एका वर्षावर आयुष्य मिळाले नाही. हितचिंतक--हे साप्ताहिक पणजी येथे कै. मंगेश मुकुंदराव देशपांडे यांनी १९०० साली सुरू केले. परंतु १९०१ तच ते बंद झाले.. - सुदर्शनः--हे मासिक प्रो. भिमाजी मुकुंदराव देशपांडे यांनी १९०० साली काढले होते परंतु दुसरा अंक न निघतांच तें विराम पावलें. यापुढच्या नियतकालिकांची थोडी तरी ओळख देऊ शकत असल्याने ती जात आहे. सत्संगः--हे मासिक चैत्र १८२४ त कुंभारजुवें येथे श्रीयुत श्रीनिवास लखू . भांडारी यांच्या नांवाने निघाले. तथापि संपादकीय काम श्री. रामचंद्र वामन नायक करंडेशास्त्री यांचेकडे होते. श्री. दत्ताराम जगन्नाथ बोरकर, श्री. शांबा कृ. सू. सरदेसाई इत्यादि लेखकांचे लेख यांतून प्रसिद्ध होत असत. सत्य तेच विचार निर्भिडपणे जनतेत फैलावण्याचे दुर्घट कार्य या मासिकानें बराच काल केले. मागें ज्या ग्रंथाचा आम्ही उल्लेख केला आहे ते “ अवतार रहस्य," जुना इतिहास या सदराखाली यातूनच खंडशः येत होते. “ सुचरित गालंतिका,” " वाक्कुटार प्रहार,” " मोठ्यांचे छोटे दोष," इत्यादि सदरें फारच बहारीची येत होती. जुन्या इतिहासाच्या दर्शनाने चिडून इंग्लिश सरकारने ह्या मासिकाचा ब्रिटिश हिंदुस्थानांतील प्रसार बंद केला. आणि नुकत्याच स्थापन झालेल्या रिपब्लिकन सरकारकडे मागणी करून त्यांच्याकरवी हे' उत्कृष्ट मासिक बंद पाडविलें. सुंदर मराठी भाषेच्या लेखनास सत्संगानेच प्रारंभ केला म्हटले असतां चालेल. पथ्यबोधः--हें आरोग्यविषयक मासिक केरी-फोडे येथे सुप्रसिद्ध भिषग्वर रामचंद्र पांडुरंग वैद्य हे १९०४ सालापासून काढीत असत. यांतील भाषा जरा जुन्या वळणाची होती, तथापि आरोग्यविषयक लेख व कवितांमुळे ते बरेच लोकप्रिय झाले.