पान:गोमंतक परिचय.pdf/227

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय चर्चात्मक असा मजकूर लिहायला जरूर असलेली साधनसामुग्री मिळाली नाही.. तरीपण वाङ्मयाच्या या भागांत झालेले प्रयत्न होतां होईतों साकल्याने द्यावयाचा प्रयत्न केला आहे. देशसुधारणेच्छु:--हें आरंभी मासिक स्वरूपांत रायबंदर येथे इ. स. १८७२ जुलईच्या ५ ला प्रसिद्ध झाले. त्याचे संपादक कै. आत्माराम पुरुषोत्तम सुखठणकर हे होते. पुढे सप्टेंबरांतच ते बंद पडले आणि १८७७ त साप्ताहिक स्वरूपांत पुनः. प्रसिद्ध होऊ लागले. त्याला पोर्तुगीज बाजही होती. एकाच वर्षाने तें बंद पडले. _जोर्नाल दज् नोव्हश् कोंकीश्तश्:--( नवीन काविजादीचें वर्तमानपत्र ) हे साप्ताहिक ता. ९ एप्रिल इ. स. १८८२ साली पार्से येथे श्री गोविंद भास्कर पार्सेकर यांच्या संपादकीयत्वाखाली प्रसिद्ध होत होते. त्यांत पोर्तुगीज विभागही होता चार वर्षे चालुन ता. १७ जानेवारी १८८६ रोजी ते बंद पडले. गोवामित्रः--हे मासिक इ. स. १८८२ साली ओडली येथे प्रसिद्ध होई. त्याचे संपादक कै. सुब्राव लक्ष्मण नाईक हे होते. एकाच वर्षाने तें बंद पडलें. गोवात्माः --हे साप्ताहिक मडगांव येथे श्री. व्यंकटेश रामचंद्र नाईक यांनी ता. ३ आगस्ट १८८५ रोजी काढले. ते सुमारे चार वर्षे चालून १८८९ साली बंद पडले. . आर्यबंधु:--हे मासिक १८८५ च्या आगस्टांतच म्हापशे येथे सुरू झाले होते.. या मासिकांत देखील पोर्तुगीज विभाग होता. पांच सहा महिन्यांतच ते बंद झालें. शेवटचा अंक ता. १६ जानेवारी १८८६ रोजी निघाला होता. गोवापंचः--हे साप्ताहिक श्री. श्रीपाद व्यंकटेश वागळे यांच्या संपादकत्वाखाली म्हापशे येथे १८८५ पासून निघत असे. इ.स. १८८८ साली त्यांत पोर्तुगीज विभाग सुरू झाला व लागलीच तें बंद पडले, पण पुनः इ. स. १८९१ साली तें श्री. रघुवीर लक्ष्मण संजगिरी यांच्या नावाने सुरू झाले व एक वर्ष चालून मग कायमचे बंद पडले. त्या काळच्या म्हापशांतील पंच मंडळीच्या, म्हणजे दणाईत, जोशी, वागळे, सावकार, तेलंग इत्यादि अनेक मंडळीच्या सामाजिक व राजकीय मतांचें तें दर्शक होते व या साप्ताहिकानें जागृतिही बरीच केली होती. गोमांतकः-हें मासिक पणजी येथे कै. व्यकंटेश यशवंत शिंगबाळ हे १८९० सालापासून काढीत होते. त्यांत कांही भाग पोर्तुगीज भाषेतही येत होता. एकाच वर्षांत ते बंद झाले.