पान:गोमंतक परिचय.pdf/226

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ७ वें. विट्ठल हेदे शिरोडकर यांचे भारतीवीर नांवांचे नाटक लिहून प्रसिद्ध केलें. कै. विश्वनाथ पांडुरंग हेदे यांची संगीत नलदमयंती व गवळणकाला ही नाटके प्रसिद्ध केली आहेत. कै. भास्कर जयराम आजगांवकर यांनी "सुशील रंगी रंगराव" ही दिपाजी राण्याच्या बंडावरील कादंबरी लिहिली. शिवाय दोन तीन फार्सहि लिहून प्रसिद्ध केले. श्री. वामन नारायण घांटकार यांनी “ मराठी पोर्तुगीज भाषांतर पाठमाला" हे पुस्तक १८९३ साली प्रसिद्ध केले व पुढे मराठी पोर्तुगीज कोशही तयार करून खंडशः छापला होता. परंतु लोकाश्रयाच्या अभावीं तोही अपुराच राहिला. कै. दत्ताराम जगन्नाथ बोरकर यांच्या 'अवतार रहस्य' या छोटेखानी पुस्तकांत अवतारांवर तूर्तचे इंग्रजी राजकारण फारच खुबीने रंगविले आहे. त्यामुळे ते इंग्रज सरकारने जप्तही केले आहे. श्री. विष्णु रंगाजी शेळडेकर व मुकुंद सदाशिव शेळडेंकर या बंधुद्वयाने श्री. शांतादुर्गा संस्थानचा इतिहास परिश्रमपूर्वक लिहून प्रसिद्ध केला आहे. त्यामुळे तो फार चांगला झाला आहे. श्री. मुकुंदबाबा शेळडेकर यांचे " बापाचा मुलास उपदेश " हे पुस्तक शाळाखात्याने वक्षिसास लायक ठरविले आहे. या शिवाय रा. मुकुंदबाबा यांनी दोन तीन पोर्तुगीज कादवांची भाषांतरें केली आहेत व पोर्तुगालच्या इतिहासाचा बराच भागही त्यांचा तयार आहे. परंतु या पुस्तकांना अजन प्रकाशक लाभला नसल्याने ती अप्रसिद्धच आहेत. श्री. वामन रामचंद्र नायक कडे शास्त्री यांचा श्री कैवल्यपूर मठाचा इतिहास १९११ त प्रसिद्ध झालेला आहे. अत्यंत परिश्रमपूर्वक मिळविलेल्या माहितीने हा ग्रंथ भरलेला आहे. श्री. यशवंत म • सरदेसाई यांची " स्मेला जुमेला" ही छोटेखानी कांदबरी चित्रशाळेतून दितीयाली लाभ मिळविण्यांत भाग्यशाली झाली असून तिचं हिंदी भाषांतरही झाले आहे की दत्तात्रेय तुकाराम फणशीकर यांचा प्रमाणसहस्री हा ग्रंथ नुकताच प्रसिद्ध झाला आहे त्याचप्रमाणे श्री. सुब्राव रामकृष्ण सामंत यांनी, हिंदी लोक व फिरंगी संस्कृती हैं पुस्तक प्रसिद्ध केले आहे. डॉ. गणपत पांडुरंग काळोखे यांचे आरोग्य विषयावरील श महाराष्टीयांच्या परिचयाचेच आहेत. तूर्त तर गोमंतकांत “उत्तिष्टत जाग्रत" यांचाच काल असल्यामुळे लेखकांचा भर आलेला दिसतो. श्री. दत्तात्रय व्यं. पै. यांची गोमांतकाच्या भूगोलाविषयींची दोन पुस्तकें विशेष सरस झाली आहेत. श्री. पै. यांनी पोर्तुगीज भाषा प्रवेश हे पुस्तकही फारच उपयुक्त असे केले आहे. त्यांनी आणखी दोन तीन पुस्तके लिहिली असून लवकरच ती प्रसिद्ध होणार असे समजतें. आतां नियतकालिकांकडे वळायचे तेवढे राहिले. कमनशीबाने त्या विषयी