पान:गोमंतक परिचय.pdf/223

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

८७ प्रकरण ७ वें. वरीच कविता चांगल्या पैकी असून अजून अप्रसिद्धच आहे. कै. माधव नारायण वैद्य यांची महाडदोळची यात्रा हे पुस्तक फारच सुंदर आहे. कै. भिमाजी मुकुंदराव देशपांडे हे पणजीचे गृहस्थ उत्कृष्ठ कविता करीत. हे मराठी प्राथमिक शाळचे प्रोफेसर होते. यांची कविता स्फुट असून “ वज्रदेही" या टोपण नांवानें मासिकांतून नियतकालिकांतून वेळोवेळी प्रसिद्ध झाली आहे. विद्यमान कवींत श्री. रामचंद्र पाडुरंग वैद्य यांची पथ्यबोध मासिक पुस्तकांतील कविता फारच सुरस आहे. महाशेलचे श्री. रामचंद्र वामन नायक करंडेशास्त्री यांची सत्संग मासिकांतून “ तोच मी" या सहीने आलेली उपहासात्मक कविता उत्कृष्ट आहे. पेडण्याचे वे. दत्तात्रेय तुकाराम पणशीकर यांची "जामात्यास नजराणा " "व्रतबंध वर्णन" इत्यादि कविता प्रासादिक व काव्यपूर्ण आहे. असोळडेंचे श्री. विष्णु रंगाजी शेळडेंकर यांचे चंद्रेश्वरमहात्म्य उत्तम काव्यापैकी आहे. या आमच्या मित्रांची बरीच स्फुट कविता अजून अप्रकाशित आहे. यांच्या देवीचरितामृत या सुन्दर ओवीबद्ध पुस्तकाला दुसऱ्या आवृत्तीचे भाग्य लाभले आहे. काकोडेंचे श्रीयुत रामकृष्ण अनंत काकोडकर हे देखील चांगल्यापैकी कवि आहेत. त्यांचे " जिबबादादाबक्षी चरित्र प्रसिद्ध झालेले आहे. - आतां आमच्या सोबत्यापैकी सांगावयाचे राहिले. या मंडळींत श्री. यशवंत सू. सरदेसाई यांची काव्यशक्ति बऱ्याच उच्च दर्जाची आहे, नमुन्यादाखल "दुध सागर" 'गोमंतका जागा हो.' व दे. दास यांच्या वरील त्यांच्या कविता मनोरंजन व हिंदूंत प्रसिद्ध झालेल्या पहाव्या. शिवाय अनेक मासिकांतून त्यांच्या कविता पूर्वी आल्या आहेत. त्यांनी तूर्त 'गोमंतक गीत' नावाचे एक सुंदर गीत केलेले प्रस्तुत लेखकाने पाहिले आहे. फोंडेच्या स्वयंसेवक मासिकांतील देमांदमहात्म्याचे लेखक श्री. विनायक का. प्रियोळकर यांची काव्यशक्ति उत्तम असल्याची साक्ष तें काव्य वाचलेले देतीलच. आमच्या पुढच्या पिढीतील कवींविषयी सांगतानां श्री. विनायक स. सुखठाणकर व दामोदर अच्युत कारे हे उभय कवि नावारूपास येतील असे अनुमान करण्यास जागा आहे. उभयतांच्या कविता महाराष्ट्रीय वाचकांच्या पूर्ण परिचयाच्याच आहेत. गोमांतकीय कवींचे विगहमदृष्टया दर्शन झाल्यावर आतां ग्रंथकारांकडे वळू. - ग्रंथकारांपैकी कै. महेश्वरभट्ट सुखठाणकर याचा उल्लेख प्रसिद्ध पुरुषांच्या मालिकेत आलाच आहे. त्यांनी केलेल्या बहुतेक साऱ्या टीका मराठी भाषेतूनच आहेत. महेश्वर