पान:गोमंतक परिचय.pdf/224

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय ८८ बांबाच्या स्मारकाप्रीत्यर्थ महाशेल गांवांत “ सारस्वत विद्यापीठ" नांवांचे पुस्तकालय १९०३ सालच्या सुमारास स्थापनही झाले होते. वै. सदाशिव नारायण वाघ यांनी इ. १८१९त मराठी व्याकरण केले होते, परंतु छापखान्याच्या अडचणीमुळे ते प्रसिद्ध झाले नाही. वै. बहुगुण कामत वाग यांची गोमंतकाची बखर मात्र प्राचीप्रभेत प्रसिद्ध झालेली आहे. कै. सूर्याजी आनंदराव. देशपांड्यांविषयींची माहिती देखील पूर्वी आलेलीच आहे. मराठी पोर्तुगीज कोशाशिवाय १८४७ साली त्यांनी दोन क्रमिक पुस्तकें व मराठी पोर्तुगीज व्याकरण १८७५त सरकारी छापखान्यांत प्रसिद्ध केले. कै. सूर्याजीरावांच्या कोशांचा 'अ' पासून पुढचा भाग अद्याप अमुद्रित आहे. निदान देशपांडे घराण्यांतील मंडळीने तो छापून घेण्याचा प्रयत्न करावा अशी आमची त्यांना विनंति आहे, प. वा. सदाशिव शेणवी साखरदांडे यांनी इ. स. १८५९ “ स्तवनार्थ निबंध " नांवाचे छोटें पुस्तक “ मुंबईचे हिंदु" या टोपण नांवाने लिहून व्हाश्कोंसेलुस ह्या पोर्तुगीज जज्जाने मनुस्मृति व हिंदु चालीरीति यांवर केलेल्या टीकेला सडेतोड उत्तर दिले आहे. कै. यशवंत फोंडबा नाईक दणाईत व रामचंद्र गोविंद वागळे यांनी १८७३ त “गोमांतकाचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास” लिहून प्रसिद्ध केला. एतद्विषयी मराठीतील आजवर हा एकच ग्रंथ असल्यामुळे त्याचे विशेष महत्व आहे. उपरोक्त दणाईत यांनी मराठी पहिले पुस्तक, युरोपाकाकूच्या शाळेतील मारामारी, इत्यादि पुस्तकें प्रसिद्ध केली आहेत. कै. सूर्याजी सदाशिव महात्मे यांनी “वेषधारी पंजाबी" ही कादंबरी लिहिली व आनंदलहरी हे मासिक १८७०त चालविले होते. कै. मुकुंद व्यंकटेश शेणवी सांवर्डेकर यांनी पोर्तुगीज मराठी कोश केला आहे. श्री. शांबाराव सरदेसाई यांनी त्याचे संशोधन करून प्रसिद्धीकरणही सुरू केलें. होते. परंतु लोकाश्रयाभावी D या अक्षरावरच त्याची मजल बंद पडली. कै. मुकुंदबाबांनी. केलेली बऱ्याच पोर्तुगीज कायद्यांची भाषांतरे त्यांच्या पुत्रांकडे आहेत. परंतु प्रसिद्धीचा मात्र त्यांना अद्याप लाभ झाला नाही. श्री. भास्कर गोविंद रामाणी यांनी "गंगी आणि सूर्यराव ” व “ साध्वी तारा" अशा दोन कादंबऱ्या लिहून प्रसिद्ध केलेल्या त्या वेळेच्या मानाने पाहतां बऱ्यापैकीच आहेत. श्री. चिंतामण गणेश भट्ट वागाळी यांचे हेममुक्तासंवाद हे नाटक चांगले आहे. मराठी शिक्षण पद्धतशीरपणे घेतले नसतांना देखील श्री. जगन्नाथ शेट नाटेकर यांची संगीत हरिश्चंद्र, सं. बाजीराव मस्तानी व संगीत गवळण काला, ही नाटकें बरी वठली आहेत. त्याचप्रमाणे श्री. सदाशिव पांडुरंग वागळे यांचे संगीत वासवदत्ता हे नाटकही चांगले झाले आहे. कै. माधव