पान:गोमंतक परिचय.pdf/222

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय हल्ली तीत चौथ्या इयत्तेपर्यंत शिक्षण मिळते. तींत १२१ विद्यार्थी असून त्यांतील १९ मुली व तीन अस्पृश्य आहेत. मासिक फी ३० रु.; वर्गणी ४५ रु.; फंडाचे व्याजा २५ रु., मिळून दरमहा शंभर रुपये उत्पन्न असून तीन शिक्षकांचा पगार ८५ रुपये व किरकोळ खर्च १५ रु. मिळून तेवढाच खर्च आहे. कायम फंडांत तूर्त ४ हजार रुपये आहेत. संस्थेला स्वतःची इमारत सुमारे ५ हजार रुपयाची हल्लीच बांधलेली आहे. संस्थेतर्फे वाचलयही चालतें. वाङ्मयविषयक प्रयत्नः--गोमंतकीयांचे वाङ्मयविषयक प्रयत्न काव्यरचना, गद्यग्रंथरचना व नियतकालिकें अशा तिहेरी स्वरूपाचे आहेत. क्षेत्राच्या आकुंचितपणामुळे किंवा इतर अनेक कारणांमुळे, गोमंतकाचे हे प्रयत्न बऱ्याच अंशी अप्रकाशितच राहिले आहेत. सृष्टिसौंदर्याच्या विपुलतेचा परिणाम कविप्रतिभेवर साहजिकच होत असतो. तसा तो इकडेही झालाच. बहुतेक गोमंतकीय कवींची कृति सुलभता, प्रासाद, माधुर्य इत्यादि गुणांनी रमणीय स्वरूपाची झाली आहे. जुवेचे रहिवाशी तुकारामबाबा वर्दे यांची कविता भक्तिरसाने ओथंबलेली आहे. त्यांच्या कवितेपैकी नीतिशतकाचे भाषांतरच कायतें मुद्रित झालेले आहे. यांचा जन्म १५७२ च्या सुमारास झाला होता. नायक स्वामीची पद्ये अजूनही श्रीस्थळ मंगेशीत पालखीकडे म्हणण्यांत येतात. गोमंतकांत मोरोपंती आर्या यांनीच प्रथम आणिल्या. फोडेंचे पांडोबा कैसरे यांची कविता देखील रसाळ आहे. त्यांचे द्रौपदीस्वयंवर फार प्रसिद्ध आहे. याशिवाय हनुमंत संवाद, शिवनिशाख्यान, थालिपाक. इत्यादि काव्येही त्यानी रचिली. इ. स. १७५० च्या सुमारास सुवृत्तमुक्तामाला नांवाचें काव्य हरी पंडीत यांनी केले. त्यांत छंदशास्त्राचे विवेचन आहे. पांडोबा दुभाषी हे डिचोलीचे रहिवासी होते. त्यांची वेदांतपर पये बरीच प्रसिद्ध आहेत. महाशेलचे रहिवासी शिवराम शास्त्री सुखठणकर ऊर्फ सोयरूभट्ट यांनी वेदांतचूडामणी ग्रंथावर समश्लोकी व संध्यामंत्रार्थदीप असे दोन ग्रंथ इ. स. १८७७ साली रचलेले अप्रकाशित आहेत.. डोंगरीचे कै. कृष्णभट बांदेकर यांची भक्तिपर पवें फारच रसाळ आहेत. १८८२ साली अबकारी खात्यांत कै.अण्णा किर्लोस्कर इकडे आल्यावेळी भटजींच्या डोंगरीवरील नाटकांचे प्रयोग पाहून ते खूष झाले व भटजींकडेच त्यांनी नारळ प्रसादासह नाट्यरचना व नाटक यांचा उपदेश घेतला होता. बांदेकरांचा स्वात्मतत्वामृतशतक हा ग्रंथ प्रसिद्ध झाला आहे. पेडणेचे राघोबा प्रभू देसाई यांनी अनेकार्थध्वनिमंजिरी नांवाचा आर्याकोश केलेलाही चांगलाच आहे. कै. हिरबा नाईक सरदेसाई यांची