पान:गोमंतक परिचय.pdf/221

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ७ वें. दुसरा, अशा तीन शाळा चालतात, मराठी शिक्षणाकडे एकंदर ८ शिक्षक असून रोर्तुगीज प्राथमिक शिक्षणाचाही एक वर्ग मुख्य शाळेत चालतो. पोर्तुगीज शिकणारे विद्यार्थी २५ आहेत. मराठी विद्यार्थी एकंदर ३८१ असून त्यांतून १२० मुली आहेत. मराठी अध्यापकांचा पगार १९७ रु. दरमहा आहे. फीचे उपत्न सरासरी १३० रु. असते. शाळेला मठग्रामस्थ हिंदुसभेतून मदत मिळते. मडगांवच्या श्री दामोदर विद्याभुवनाजवळ धर्मशाळा बांधून तींत मुख्य शाळा चालते. व बाकी दोन शाळा भाड्याच्या घरांतून भरतात. शाळेच्या परिक्षा घेणाऱ्या तज्ज्ञांनी वेळोवेळ तिला उत्तम शेरे दिले आहेत. शिक्षणक्रम पांच इयत्तांचा आहे. . शारदा विद्यालय, कुंभारजुवेंः-या विद्यालयाची स्थापना इ. स. १९१३ झाली. श्रीयुत गणेश शिवराम सामंत हे या शाळेचे मुख्य अध्यापक आहेत. किंबहुना ते तिचा आत्माच आहेत म्हटले असतां चालेल. त्यांच्या कळकळीमुळे कुंभारजुव्यांतील या शाळेला स्थानिक व इतर ठिकाणच्या सद्गृहस्थांची मदत मिळवितां आली, तूर्त तीत तीन शिक्षक काम करित असून विद्यार्थांची संख्या १६० आहे. त्यांतून ४० मुली आहेत. शाळेचें वार्षिक उत्पन्न १ हजार व खर्च तेवढाच आहे. श्री. सामंत व स्थानिक पुढारी यांच्या प्रयत्नाने शाळेला दहा बारा हजार रुपयांची इमारत बांधतां आली. तूर्त तिचें काम अजून अपुरेच आहे. शाळेत ५ इयत्तांचा अभ्यासक्रम चालत असून दरसाल श्री सरस्वती उत्सवांत व्याख्यानमालाही चालते. नवीन पद्धतीने शिक्षण देण्यांत या शाळेची प्रख्याती आहे. चांगल्या चांगल्या परिक्षकांनी ही शाळा तपासून उत्कष्ट शेरे दिले आहेत. ज्ञानप्रसारक संघ, म्हापशेंः--ही संस्था वैश्य समाजाने स्थापन केली असून शिक्षण मोफत असणे हा तिचा विशेष आहे. इ. स. १९०८ साली तिची स्थापना झाली. शाळा व वाचनमंदिर अशा तिच्या दोन पोटसंस्था आहेत. शाळेत तूर्त तीन शिक्षक असून १४० मुलगे व ४५ मुली मिळून १८५ मुले शिक्षण घेतात. शिक्षण ४ इयत्तांपर्यंत चालते. संस्थेतर्फे इतर चळवळीही चालतात. म्हापशे येथील वैश्य समाजांत जी जागृति दिसते तिचे श्रेय या संस्थेकडे आहे. दासनवमी, शिवजयंति, शारदोत्सव, गीताजयंति इत्यादि उत्सवही होतात. उत्पन्न सुमारे १५० व तेवढाच खर्च आहे. विद्यावर्धक मंडळ, डिचोली:--इ. स. १९१२ साली आगस्टच्या १ ल्या तारखेस संस्था स्थापन होऊन, ता. १ जानेवारी १९१३ रोजी शाळा सुरू झाली.