पान:गोमंतक परिचय.pdf/220

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय तांदळाऐवजी आतां रोकड वर्गणीच घेण्यात येते. ह्या शाळेला परिक्षकांकडून उत्तमोत्तम शेरे मिळाले आहेत. शिक्षणक्रम मराठी चौथी पर्यंतच असतो. २ सारस्वत विद्यालय म्हापशेः-म्हापशे येथे १९१० सालच्या डिसेंबरांत भरलेल्या दुसऱ्या संयुक्त गौड सारस्वत ब्राह्मण परिषदेने मिळविलेल्या फंडांतून ही मराठी शाळा चालली आहे. तिला १९११ साली सुरुवात झाली. सुमारे १५-२० हजार रुपये खर्चुन बांधलेली प्रशस्त आणि सुंदर मध्यवर्ति इमारत या शाळेच्या मालकीची आहे. बांके, शालोपयोगी सामान, इत्यादि उपकरणांनी युक्त अशी ही शाळा प्रमुखत्वे मुंबईचे श्रीमंत शांताराम नारायण दाभोळकर यांच्या दानशूरतेमुळे, प. वा. काकासाहेब दणाईत ह्यांनी अत्यंत परिश्रम करून नावारूपास आणली. तूर्त या शाळेत ५ शिक्षक काम करीत असून १९३ विद्यार्थी शिकतात. त्यांपैकी ४३ मुली आहेत. शिक्षणदानाच्या कामी या ठिकाणी स्पश्यास्पृश्यता, धर्मभेद, जातिभेद, वर्णभेद इत्यादि साऱ्या भेदांनी रजा दिली आहे. परिषदेच्या फंडाचे व्याज सुमारे ४०० रुपये; श्री. शांताराम ना. दाभोळकर यांच्या देणगीचे व्याज स्वतंत्रपणे सुमारे २५० रु.; कै. बाळकृष्ण बाबुराव तेलंग यांनी दिलेल्या इस्टेटीचे उत्पन्न सुमारे १०० रुपये; फीचे उत्पन्न सुमारे ६०० रुपये; बारदेश म्युनिसिपालिटीची ग्र्यांट १८० रुपये; वर्गणीदारांची वर्गणी २५० रुपये व इतर देणग्या मिळून अजमासे १८०० रुपये उत्पन्न आहे. खर्चाचे मान वाढते आहे. संस्थेची नियमावली सरकारांत नमूद व मंजूर झाली असून रिझर्व फंड १२७०० आहे. सांप्रत संस्थेचे चिटणीस श्री. शांबाराव सरदेसाई असून खजिनदार मुंबईचे श्री. शांताराम ना. दाभोळकर हे आहेत. - ३ श्री दामोदर विद्यालय मडगांवः—ह्या शाळेची स्थापना १९.१२ च्या जानेवारीत झाली. मडगांवच्या मठग्रामस्थ हिंदुसभेमार्फत नेमण्यांत आलेल्या शिक्षणमंडळाकडून तूर्त तिचा कारभार चालतो. आरंभी बरीच वर्षे श्रीयुत विष्णु रामचंद्र नायक यांच्या देखरेखीखालीच ती चालत होती. श्रीयुत नायक यांच्याकडे असलेल्या "दहाजण” नामक संस्थेच्या फंडाच्या व्याजांतून ते ही शाळा चालवीत असत में मडगांवांत शिक्षण प्रसारक संघ नांवाची संस्था स्थापन होऊन तिच्या हाती शाळेची मने गेली. परंतु श्री. विष्णु नायक यांची अमोल मदत शाळेला होतीच. या दोन वर्षांत मठग्रामस्थ हिंदुसभेची स्थापना होतांच संघाने ही संस्था हिंदुसभेच्या ताव्यांत दिली, तत या विद्यालयाच्या, मुख्य शाळा, शाळा क्रमांक १ ला व शाळा क्रमांक आहेत.