पान:गोमंतक परिचय.pdf/217

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ७ वें. - इ. स. १९२३ त शाळांची ही वांझोटी योजना बदलून शिक्षणक्रम दोन ग्रावांत विभागला गेला व मराठी सेगुंद ग्रावाच्या परिक्षेस पोर्तुगीज प्रिमर ग्रावाची लायकी देण्यात यावी असे कायद्याने ठरले होते. परंतु हा कायदा अमलांत येण्यासाठी जे कानू करावे लागतात ते अजून झाले नसल्याने, ती सुधारणा दफ्तरच्या वाढीला मात्र उपयोगी पडली. नाही म्हणायला या कायद्याने एक दोन अक्टिग शिक्षकांचा मात्र फायदा झाला व उघड उघड चढाओढीच्या परिक्षेशिवाय ते कायम झाले. दफ्तरदाखल अशा कायद्याची दुसरीही एक गोष्ट म्हणजे, रिपब्लिकन सरकारने नव्या काबिजादींच्या हातावर १९१३ साली सोडलेल्या वीस शाळांची होय. या शाळांतून नेमावयाचे शिक्षक मराठी जाणणारे असून त्यांनी मराठीतूनच पोर्तुगीज शिकवावे असा ठराव झाला होता. परंतु मराठीच्या दुर्दैवामुळे ही अटही दफ्तरदाखलांतच जमा झाली व पोर्तुगीज शाळांची संख्या फुगण्याकडे मात्र त्याचा उपयोग झाला. त्यांतील ९।१० शिक्षक देखील नव्या काबिजादी ऐवजी जुन्याच काबिजादीत नेमले गेले ! - यानंतरची मह वाची घडामोड म्हणजे, सांगे कोसेल्यांतील उभय मराठी शाळांची झालेल्या उच्चाटणाची होय. १९२४ साली सांगें म्युनिसिपालिटी तात्पुरती बंद करून सरकारने तिचा कारभार आल्फॉरिश ( सेकंड लेफ्टनंट ) व्हिलार या पोलिस अंमलदाराच्या अध्यक्षतेखाली एक कमेटी नेमून तिच्या हाती दिला. दाभाळच्या शाळेला जी वार्षिक १८० रुपयांची रक्कम म्युनिसिपल तिजोरीतून मिळत होती ती या कमेटीनें काटकसरीच्या सबबीखाल बंद केली. त्यामुळे १९२५ अखेरीस ही शाळा बंद झाली. कुर्डीच्या शाळेला घर व विद्यार्थी नाहीत म्हणून तीही यापूर्वीच १९२४ साली बंद झाली होती. ही जरी बाह्य कारणे असली तरी अंतस्थ कारणे निराळी होती व त्यांचे मूळ त्यावेळच्या निवडणुकांच्या कारस्थानांतून उत्पन्न झाले होते असे म्हणतात. १९२६ सालच्या जुलई महिन्यांत कुर्डीची बंद केलेली शाळा बऱ्याच प्रयत्नाने दाभाळ मुक्कामी बदलून पुनः उघडण्यात आली. अर्थात् आजमितीस मुळच्या आठ शाळांपैकी सातच शिल्लक आहेत. १९२७-१९२८ साली या सातही शाळांत मिळून २३३ विद्यार्थी होते; त्यांत १७६ हिंदु, २८ ख्रिस्ती व २९ मुसलमान होते. परिक्षा मात्र १० च जणांनी दिली. हिंदु प्रजेचे खासगी प्रयत्नः--प्रस्तुत लेखकाने १९२५ साली गोव्यांतील मराठी शिक्षणसंस्थांची माहिती मिळविण्याचा प्रयत्न केला होता. त्या प्रयत्नांत सांगें, के काणकोण, सासष्ट, मुरगांव, तिसवाडी व बारदेशचा अधो अधिक भाग इतक्या क्षेत्रांतील एकंदर शाळा त्याने स्वतः हिंडून पाहिल्या होत्या. गोव्याची शिक्षणविषयक