पान:गोमंतक परिचय.pdf/216

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय यांतून सांगें कोसेल्यांतील दोनही शाळा फिरत्या स्वरूपाच्या (escolas moveis) असत व त्या सांगें, किर्लपाल, दाभाळ, कुएँ, धारवांदोडे, मलें, सांकोर्डे, इत्यादि ठिकाणी फिरत असत. मेजर टी क्यांडी साहेबांच्या क्रमिक पुस्तकांच्या तनि इयत्ता, पोर्तुगालचा भूगोल व इतिहास, मेट्रिक सिस्टीम व दशांक अपूर्णांक, एवढाच त्यांचा अभ्यासक्रम होता. ___ पूर्वी सांगें कोसेल्यांतील प्रत्येक शिक्षकाला १५ रुपये, वाळपईच्या शिक्षकाला १२॥ रुपये व इतर ठिकाणच्या शिक्षकांना प्रत्येकी वीस रुपये असा दरमहा मिळत असे. . इ. स. १९११ साली साऱ्या शिक्षकांना एकाच स्केलाने पगार मिळू लागला व त्याचे प्रमाण पोर्तुगीज प्राथमिक प्रोफेसरांच्या तिसऱ्या वर्गाप्रमाणे ठरविण्यांत आले. मात्र मराठीच्या शिक्षकांना बढती नव्हती. अर्थातच त्यांना आतां ३५ रुपये दरमहा मिळत होता. __ रिपब्लिकच्या स्थापनेच्या साली या सातही शाळांत मिळून एकंदर १३६ मुले शिकत होती. पैकी परिक्षेला केवळ १२ च बसली होती. या मराठी शाळेच्या परिक्षेचा पुढें उपयोग नसल्यामुळे किंवा ह्या परिक्षा केवळ औपचारिकच दिसत असल्यामुळे, शाळांतूनही फारसे विद्यार्थी नसतात आणि असले तरी त्याचे लक्ष्य परिक्षेचा अभ्यास करण्याकडे नसते. रिपब्लिकच्या स्थापनेनंतर १९११ साली सांखळी येथे एक शाळा स्थापण्यांत आली व शाळांचा नंबर साताऐवजी आठ झाला. शिक्षणाची स्थिति मात्र पूर्ववत होती. इ. स. १९०७ पासून आजवर ह्या शाळांतून रिकाम्या झालेल्या शिक्षकांच्या जागांवर कायद्याप्रमाणे उघड परिक्षा घेऊन एकाही शिक्षकाची नेमणूक झालेली नाही. सारे शिक्षक अक्टिग याच सदरा खाली कामावर होते. इ. स. १९२०-१९२२ साली या आठही शाळांतून २२८ मुले शिकत होती. त्यापैकी १४ परिक्षेस बसली होती. शिक्षणाचे गाडे यथातथाच असल्यामुळे अजूनही या शाळांचा फायदा प्रजेला मिळावा तसा मिळत नाही.. - इ. स. १९१३ साली रुपयाची किंमत ४०० रैसा ऐवजी ३५० रैसावर आणली गेल्याने, ३५ ऐवजी दरमहा ४० रुपये मिळू लागला व पुढे १९२२ च्या पगारवाढीत आज मितीस तो ५९॥ रुपये झाला आहे. यांतून शेकडा ५ टक्के पेन्शनफंड व २ टक्के इन्कमट्याक्स घेण्यात येतो. Rm