पान:गोमंतक परिचय.pdf/215

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ७ वें. च्या काळांत साऱ्या गोमंतकभर मराठीच्या शाळाच शाळा स्थापन होऊ लागल्या. 'परंतु त्यांचे वर्णन करायच्या आधी सरकारचे मराठीशी काय संबंध होते ते पाहूं. पोर्तुगीज सरकार व मराठी भाषाः-वाटाबाटीच्या काळी झालेले अनन्वित जुलूम आपण तिसऱ्या प्रकरणांत सविस्तर पाहिलेच आहेत. धर्मप्रसार व संस्कृतिवर्धन हेच कायतें पोतुगीजांचें प्रधान ध्येय होते. आणि म्हणूनच देशभाषा प्रचारांतून नष्ट करण्यासाठी त्यांनी भगीरथ प्रयत्न केले. परंतु भाषा म्हणजे संस्कृतीतील अत्यंत महत्वाचा दुवा होय संस्कृतीच्या घटकांपैकीं इतर सर्व बाबी कदाचित्. सोडतां येतील परंतु भाषेचा त्याग करणे अत्यंत दुर्घट गोष्ट आहे, हे सत्य पोर्तुगीजांच्या लक्ष्यांत यायला देखील फारसा काळ लागला नाही. परंतु त्या अगोदर धार्मिक वेडाच्या भरांत, हाती सांपडले ते सारे ग्रंथ, त्यांतून पाखंडमताचा अनुवाद केला असल्याच्या सबबीखाली, त्यांनी जाळून फस्त केले होते. सनदशीर राज्यपद्धति अंमलांत येऊन स्थिरस्थावर होतांच हिंदूंच्या भाषेकडे सरकारचे लक्ष गेले. - मराठी शिक्षणाकडे पोर्तुगीज सरकारचे लक्ष वेधण्याला, इ. स १८६९ त शिक्षण तपासणी मंडळाच्या ज्या रिपोटोंचा मागे पोर्तुगीज प्राथमिक शिक्षणाच्या विवेचनांत उल्लेख झाला आहे, तेच कारणीभूत झाले. त्यापैकी नवीन काबिजादींच्या रिपार्टीत खालील मजकूर होता. " शिरोड्यासारख्या खेड्यांत देखील मराठी शिक्षणाच्या शाळा चालत असून त्यांत पुष्कळच मुले शिकतात. परंतु पोर्तुगीज शिकण्यास विद्यार्थी मुळीच मिळत नाहीत. तेव्हां देशी व पोर्तुगीज या उभय भाषा उत्तम प्रकारे अवगत असलेला शिक्षक ठेवून त्याकडून देशभाषेच्या द्वारे पोर्तुगीज शिकविणाऱ्या शाळा काढल्यास बराच फायदा होईलसें वाटते" आणि हीच सूचना सरकारी मराठी शाळांच्या उत्पत्तीस कारण झाली. इ. स. १८७१ साली नवीन काबिजादीतील शाळा, लूझो. मराठी स्वरूपांत चालाव्या असा हुकूम सुटला. परंतु उभय भाषांत प्रवीण असे शिक्षकच दुर्लभ असल्यामुळे, इ. स. १८७९ पर्यंत तरी नव्या काबिजादीतील साऱ्याच शाळा तशा बनूं शकल्या नाहीत. इ.स.१८८७ साली नव्या काबिजादींतील एकंदर १२ शाळांपैकी डिचोली, फोंडे, सांगे व काणकोण ह्या चारच शाळा काय त्या या स्वरूपांत चालत होत्या. इ. स. १८८८ साली के येथे एक नवी शाळा उघडण्यात आली व रजत दादाराण्यांच्या बंडाच्या गडबडीत, वाळपे येथे एक शाळा स्थापण्यांत आली. नंतर त्याच सुमारास सांगे येथील म्युनिसीपल कमिटीच्या खर्चाने रिवण मुक्कामी तिसरी शाळा सुरू होऊन एकंदर सात शाळा पोर्तुगीज मराठी शिक्षण देणाऱ्या झाल्या.