पान:गोमंतक परिचय.pdf/213

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

مایا प्रकरण ७ वें. या अष्टभ्रष्ट स्वरूपानेच ओळखण्यांत येई. ज्या घरांत शाळा भरे, तेथेच शणैमामाला जेवणखाण मिळत असे आणि दर फसलेवर भाताचा ठराविक खंड मिळे. त्याचप्रमाणे दर सणाला नारळ, गूळ, पोहे, तांदूळ इत्यादि जिनसा मिळत. म्हणजे पगार असा जरी नव्हता, तरी आतांच्या पगारी मास्तरांपेक्षाही त्यांच्या कुटुंबपोषणाची सोय या जिनसांच्या रूपानेच विशेष चांगली लागत होती. व इतका त्यांचा योगक्षेम चांगला चालत होता. समाजांत शणैमामाचा दर्जा कुळकर्ण्याच्या खालोखाल महत्वाचा मानला जाई. शिक्षणाचे विषयही त्याकाळी फार नसत. बालबोध वाचन, मोडी पत्रव्यवहार--- वाचन, पत्रलेखन, रेघी अपूर्णांकांपर्यंत गणीत, व्यावहारिक हिशेबलेखन, बालबोध व मोडी लेखन आणि जुन्या कवींचे वेंचे पाठ करणे, इतका सुटसुटीत तो अभ्यासक्रम होता. एक दोन ठिकाणचे अपवाद खेरीज करून प्रस्तुत लेखकाच्या बालपणापर्यंत तो तितकाच साधा असा गोव्यांत चालत होता. या अपवादात्मक शाळा मडगांव, म्हापशें, पणजी, इत्यादि शहरांतून व क्वचित् प्रसंगी एकाद्या खेड्यांतूनही दिसत होत्या. दुय्यम शिक्षणाची कल्पनाच या जुन्या काळी नव्हती. तरी एका अर्थी असे दुय्यम शिक्षणासारखे वर्ग गोमांतकांत घरोघर असत म्हटले तरी चालेल. प्रत्येक पांढरपेशा गृहस्थाच्या ओटीवर, पावसाळ्यांत संध्याकाळी व इतर ऋतूंत रात्रौ ९ वाजेपर्यत जुन्या कवींची काव्ये घेऊन जी पंडीतसभा भरत असे, तेथे अखंड चाललेल्या गुडगुडीच्या सरबत्तीतून जे वाद विवाद चालत, तेच दुय्यम शिक्षणाचे वर्ग डोले म्हटले तरी चालेल. ज्ञानेश्वर, मुकुंदराज, श्रीधर, मुक्तेश्वर, वामनपंडीत, मोरोपंत इत्यादिकांच्या ग्रंथाचे, व्याकरण शुद्ध, अलंकार व काव्य या शास्त्रांच्या नियमांसहित जें ज्ञान या पंडितसभांतून मिळत होते, त्याची सर आतांच्या विश्वविद्यालयीन मराठी शिक्षणांत तरी येईल की नाही याची शंकाच आहे. या हिवाळ्यांतील जरा ऐसपेस रात्री; आटीवर पेटलेल्या शेकोटीच्या भोवती बसलेली घराची कर्ती मंडळी; समवयस्क मंडळींत एकाद्या करवलीच्या दिमाखाने वारंवार मिर-.. वणारी ती गुडगुडी; भिंतीशी टेंकून ठाणवईच्या प्रकाशात उंच स्वराने आलापांत का वाचणारे आसनाधिस्थ शणैमाम; आणि मधून मधून जरा संकोचानच शंका ना णारा व विद्यार्थीवजा असलेला बाल पौगंडांचा समुदाय, हे दृदय पाहण्याचे भाग्य : ओझरतेच झाले तरी प्रस्तुत लेखकाला प्राप्त झाले आहे. मुळचा दुय्यम व उच्च शिक्ष