पान:गोमंतक परिचय.pdf/212

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय प्रकरण सातवें. मराठी भाषेप्रीत्यर्थ गोमंतकाचें कार्य.. गोमंतकीय भाषेचा प्रश्नः-गोमंतकाची भाषा कोणती असा जर प्रश्न पुढे आला, तर त्याला ती कोंकणी ऊर्फ सारस्वतीच आहे असेंच उत्तर देणे भाग आहे. कोंकणी भाषा तूर्त तरी केवळ बोली भाषा आहे. तिला पूर्वी ग्रांथिक स्वरूप होते किंवा कसे असा एक व त्याही पलीकडे जाऊन ती स्वतंत्र भाषा होती, की ते मराठीचें पूर्वकालीन विकृत किंवा अपभृष्ट स्वरूप आहे, असा दुसरा असेही दोन प्रश्न आज थोडेसे वादाचा विषय होऊन बसले आहेत. आणि या प्रश्नांच्या अभ्यासाला गोमंतकाचे सुपुत्र व कोंकणीचे अभिमानी इतिहाससंशोधक, श्री. वामनराव वर्दै वालावलीकर यांनी वाहून घेतले आहे. अर्थात् या प्रश्नांचा उलगडा सत्यान्वेषण दृष्टीने त्यांच्याकडून होईलच. म्हणून तूर्त तरी आम्ही या वादांत पडू इच्छित नाही. बाकी एक गोष्ट मात्र सांगायला हरकत नाहीं की, कोंकणी भाषा ही अत्यंत गोड व गोमंतकीयांच्या जिव्हाळयाची भाषा आहे व मराठी भाषेचे प्रचंड दडपण बऱ्याच कालापासून गोमंतकीयांवर पडले असतानाही अनेक संकटांतून कोंकणी भाषा अजूनही गोव्यांतील लोकांच्या वापरांत कायम आहे. पूर्व कालापासून मराठीचा प्रसार गोव्यांत बराच झाला असून लेखनव्यवहारांत तिचाच उपयोग होत असल्याने, गोमंतकाने मराठीप्रीत्यर्थ काय काय प्रयत्न केले, त्याचे दिग्दर्शन करण्यासाठीच हे प्रकरण लिहिले गेले आहे. मराठीचे शिक्षणः-जुन्याकाळी गांवच्या कुळकण्यांनी किंवा घरच्या वृद्ध मंडळीने शेजारच्या मुलांना घेऊन बसावें व धूळपाटी, बोळू इत्यादि साधनांच्या द्वारें त्यांना अक्षरओळख करून द्यावी; स्वतः किंवा उत्तम अक्षर असलेल्या मुलांकडून इतरांना गिरविण्यासाठी लिखितें धालून द्यावी. सामान्यतः हीच स्थिति गेल्या शतकाच्या मध्यापर्यंत चालू होती म्हटले तरी चालेल. पुढे हा क्रम बदलून मराठी शिक्षणाच्या शाळा सुरू झाल्या. अशा शाळा फारकरून देवळांच्या 'सोडियां' वर किंवा एकाद्या घराच्या चौकांत भरत असत. शिक्षक गौडसारस्वतब्राह्मणच होते त्यामुळे त्यांना “ शेणवी मामा " या बहुमानार्थक विशेषणाच्या "शणैमाम"