पान:गोमंतक परिचय.pdf/210

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय ७४ सेंट थॉमस हायस्कूल, हळदुणे, (सुमारे साडेतीनशे विद्यार्थी व दहा अध्यापक); मातर दई इन्स्टीट्युशन, साळगांव, सुमारे २५० विद्यार्थी व दहा अध्यापक हीं चार हायस्कूलें. असून इतर शाळांतून प्रत्येकी सुमारे १५०।२०० तरी विद्यार्थी असतात. ___असोळणें पांच, बाणावली दोन, चांदर एक, चिंचोणें पांच, कोलवें तीन,कुकंल्ली एक, माजोडें दोन, मडगांव सतरा, नावेली दोन, ओडली दोन व राय दोन मिळून सासष्ट कोसेल्यांत ४२ शाळा आहेत. परंतु यांपैकी मडगांव येथेच कायती दोन. हायस्कूले असून बाकी शाळांतून एकच अध्यापक असतो असे समजतें. मडगांवच्या हायस्कुलांतून प्रत्येकी सुमारे २०० विद्यार्थी असतात व इतर शाळांतून विद्यार्थ्यांची संख्या सुमारे २५।३० चीच असते म्हटले तरी चालेल. मुरगांव कोंसेल्यांत वास्कोचे रेल्वे स्कूल, सायमन्स हायस्कूल, व सेंट झेवियर स्कूल अशी तीनच स्कुले आहेत. विद्यार्थी देखील बारदेशप्रमाणे भरपूर नाहींत. तूर्त पोतुगीज सरकारच्या कायद्यामुळे या शाळांतून प्रवेश मिळायला प्रिमरग्रावाचे सर्टिफिकिट आवश्यक मानले जाऊ लागले आहे, किंवा शाळांतून पोर्तुगीज प्रिमैरग्राव शिकविण्यांची सोय करणे आवश्यक ठरविण्यात आले आहे. त्यामुळे इंग्रजी शिक्षकवर्ग नाराज झाला आहे. आल्मैद कॉलेज, फोंडाः–हें कॉलेज भिषग्वर दादासाहेब वैद्य यांनी श्री. सीताराम विश्वंभर केरकर यांच्या मदतीने, लिग द प्रोपागांद द इंश्त्रुक्सांव य गोअ नांवाची जी शिक्षणविषयक लीग १९११ साली स्थापन केली, तिच्यामार्फत चालतें. आरंभी तरी कॉलेजचे स्वरूप केवळ किंवा प्राधान्ये करून इंग्रजी शाळेचें होतें. इतिहाससंशोधक दे. भ. द. वि. आपटे, दे. भ. हरीभाऊ फाटक वगैरे शिक्षक या कॉलेजला मिळाले होते. आज त्यांत प्राथमिक शिक्षणापासून सुरुवात करून लिसेवच्या पहिल्या तीन इयत्तांपर्यंत पोर्तुगीज, पांच इयत्तापर्यंत इंग्रजी व मराठी ४ इयत्ता अशी शिक्षणाची व्यवस्था आहे. श्री. वैद्य व केरकर यांनी हे कॉलेज टिकवून. केवळ लोकाश्रयावर आज १८।१९ वर्षे ते चालविले आहे हे त्यांना भषणीय आहे. देवालयाकडूनही कॉलेजला मदत मिळविण्याचा प्रयत्न करून त्यानीं तो यशस्वी केला हँच आम्हाला विशेष कौतुकास्पद वाटते. साक्षरतेचे प्रमाणः-शैक्षणिक परिस्थितीच्या वर्णनांत साक्षरतेचे प्रमाण, देतांच गोमंतकाचा शिक्षणविषयक विचार पूर्ण होईल. मराठी शिक्षणाविषयीं आमच्या प्रयत्नांचे स्वरूप पुढील स्वतंत्र प्रकरणांतच द्यावयाचे आहे. हे येथे नमूद केले पाहिजे. खालील कोष्टकांवरून साक्षरतेच्या प्रमाणाची कल्पना वाचकांना होईल.