पान:गोमंतक परिचय.pdf/209

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

७३ प्रकरण ६ वें. साली ते पोर्तुगाल मध्ये गेले व नेत्रवैद्यकांत प्राविण्य संपादन करून आले. त्यानंतरच्या १९२९ पर्यंतच्या काळांत ही संख्या ५०५५ पर्यंत पोचली आहे. शिवाय ब्रिटिश -युनिव्हर्सिटीतून पास झालेले गोमांतकीय हिंदु डॉक्टर सुमारे १५।२० आहेत व केमिस्टची परिक्षा पास झालेले हिंदू सुमारे ८ १० आहेत. स्त्रीशिक्षणाचे प्रयत्नः-इ. स. १८७१ साली ज्यूत जराल द प्रोव्हीसिय या कायदे कौन्सिलच्या सूचनेवरून स्त्रियांच्या शिक्षणासाठी पणजी, म्हापशे व मडगांव, या ठिकाणी एक एक स्वतंत्र कन्याशाळा उघण्डयाचा विचार सरकारने जाहीर केला. परंतु ही योजना अमलांत न येतां कागदावरच राहिली. पुढे इ. स. १८८७ साली मिझेरिकोर्दीच्या आश्रयाने फ्रासिश्कन पंथाच्या नन्सनी चिंबल येथे एक कन्याशाळा उघडली. तीत स्त्रियोपयोगी कामांशिवाय पोर्तुगीज, फ्रेंच व इंग्लीश शिकवीत असत. पुढे ते पणजीस आले. इ. स. १९०१ सालापासून त्यावर सरकारची देखरेख सुरू झाली. रिपब्लिकच्या स्थापनेपर्यंत ती पणजीत कशी तरी रुटुखुटू चालत होती. १९११ साली गोवा सरकारने नन्स्नी चालविलेल्या कन्याशाळेऐवजी, इश्कोल नासियोनाल दु सेक्सु फेमिनीनु नांवाचे दुसरे स्कूल स्थापन केले व त्यांत पोर्तुगीज प्राथमिक शिक्षणाच्या सोयी शिवाय पोर्तुगीज, फ्रेंच व इंग्रजी या भाषा, संगीत, 'पेंटींग, पीलो लेसीस, भरतकाम व टेलरिंग इतके स्वतंत्र वर्ग सुरू केले आहेत. मात्र त्याचा उपयोग हिंदुमुलींना घेतां येणें आहारादिकांच्या गैरसोयीमुळे शक्य नाही. - या योजनेशिवाय तीनही लिसेवांतून मुलींनी प्रवेश केला असून तेथें परिक्षेत त्यांना बऱ्याच पक्षपाताने पास करून घेण्यात येते. आणि सहशिक्षणाच्या उपक्रमामुळे व स्त्रीशिक्षकांच्या उत्तरोत्तर वाढत्या गरजेमुळे, नॉर्मल स्कुलांतहि स्त्रीशिक्षणाची थोडीबहुत सोय होते. परंतु एकंदरीत स्त्रीशिक्षणाकडे पोर्तुगीज सरकारचे लक्ष फारसे वेधलेले दिसून येत नाही म्हटल्यास तें सत्यास मुळीच सोडून नाही. इंग्रजी शिक्षणाची सोयः--गोमंतकांत ठिकठिकाणी इंग्रजी शिक्षणाची सोय आहे खरी, परंतु बारदेश प्रांतांत जशी त्याची वाढ झाली आहे तशी इतरत्र कोठेच झाली नाही. हे पुढील माहितीवरून दिसून येईल. हळदुणे येथे तीन, आसगावांत पांच, गिरवाडे येथे एक, म्हापशांत तीन, हडफड्यांत एक, नेरूल येथे एक, सोकोन्ह एक, साळगांवांत एक, शिवोली येथे एक, पहा येथे एक, थियेच्या तीन, मिळून २१ लहान मोठ्या शाळा असून, सेंट जोसेफ हायस्कूल, हडफडे, (सुमारे ४ शे विद्यार्थी व दहा अध्यापक); सेक्रेड हार्ट ऑफ जीजस, पन्हा, (सुमारे ४२५ विद्यार्थी व १४ अध्यापक);