पान:गोमंतक परिचय.pdf/207

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ६वें. hn पाठशाळेची रीतसर स्थापनाः-गव्हर्नर कोंदि द आंतश् यांनी इ. स. १८४२ साली लुव्हान ( Louvain ) युनिव्हर्सिटीचे पदवीधर, प्रख्यात डॉक्टर रुद्रीगिज् माशादु, यांच्या सल्ल्याने या पाठशाळेची रीतसर स्थापना केली, त्यांनी आंखलेला अभ्यासक्रम चारच वर्षांचा होता व वैद्यक शास्त्र ( मेडिसिन ) शस्त्रवैद्यक व औषधिक्रिया ( Pharmacia ) असे त्याचे तीन स्वतंत्र कोर्स प्रत्येकी चार वर्षांचे होते. या योजनेला पोर्तुगाल सरकारने मान्यता दिली नव्हती, तरीपण त्यामुळे शिक्षणांत मात्र अडचण आली नाही. इ. स. १८४६ त वैद्यक पाठशाळेच्या कौन्सिलने स्वतःच अभ्यासक्रमाची नवी आंखणी केली व ती पोर्तुगाल सरकारांत पाठविली असतां, इ. स. १८४७ तिला मंजुरी मिळाली. रोगनिदानाचे, सामान्य रोग निदान ( Pathologia externa ) व आंतर रोगनिदान ( Pathologia interna) असे दोन विभाग पाडण्यात आले. त्याचप्रमाणे शस्त्रवैद्यकाचा अभ्यास वाढविण्यात येऊन शस्त्रवैद्यक व वैद्यक मिळून एकच कोर्स बनला. या वेळी एकंदर ६ विषय होते. औषधीक्रियेचा ( फार्मसी ) कोर्स तीन वर्षांचा करण्यांत आला. इ. स. १८६५ साली वैद्यकीय कोर्स पांच वर्षांचा होऊन कित्येक विषयाचे विभाग पाडून त्यांची संख्या ९ वर आली. फार्मसीचा कोर्स पूर्ववत् तीनच वर्षांचा राहिला. परंतु विषयांच्या वाढीस अनुसरून अध्यापकांची संख्या मात्र ६ झाली.. इ. स. १८८८ साली गोवा सरकारनें कमीशन नेमून वैद्यकीय शिक्षणाची सुधारणा केली, त्या योजनेनुसार अभ्यासक्रम ६ वर्षांचा झाला व त्याची वाटणी विशेष पद्धतशीर होऊन २१ विषयांपर्यंत त्यांची संख्या आली. परंतु ही योजना अमलांत आली नाही. पुढे १८९९ साली डॉक्टर वोल्फांग द सील्व्ह यांच्या शिफारसीवरून Bactereólogia a Anatomia microscopica e pathológica giar अभ्यासक्रम आखून तो मंजुरीसाठी पोर्तुगालांत पाठविला होता परंतु तो पास झाला नाही. १९०७ साली व्हाक्सीन व रासायनिक पृथक्करण करण्याची ल्याबोरेटरी स्थापन करण्यांत आली. रिपब्लिकच्या स्थापनेनंतर आतां चालू असलेला अभ्यासकम पुढे दिला आहे. रिपब्लिकनंतरचा अभ्यासक्रम. sh प्रथमवर्ष 1. Anatomia discritiva 2. Fisiologia Geral e histològica