पान:गोमंतक परिचय.pdf/205

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ६वें. १८७० साली ही शाळा बंद करण्यांत यऊन तिच्या जागी शेतकी व पशुवैद्यकाची मूलतत्वे याचे शिक्षण देणारी दुसरी योजना पुढे आली. परंतु पणजी शहरांतच ही -शाळा चालावयाची असल्याने, तिला व्यावहारिक स्वरूप न मिळतां तीही पशुवैद्यक शाळेप्रमाणेच कागदावरून बाहेर पडली नाही. इ. स. १८७१ साली लष्करी शाळा बंद होतांच तिच्याऐवजी मागें सांगितलेला इंस्तितूत प्रोफिसियोनाल उघडला गेला. हा इंस्तितूत २१ वर्षे चालला होता. व त्यांत १ कामगाराचा कोर्स; २ कारखान्यांतील मेस्त्रींचा कोर्स; ३ पब्लिकवर्क्स मधील ओव्हर्सीयरचा कोस: ४ बांधकामाच्या मेस्त्रीचा कोर्स; ५ रासायनिक मेस्त्रींचा कोर्स;६ इंजीन ड्रायव्हरचा कोर्स; ७ शेतकी कामगारांचा कोर्स; ८ सर्व्हेअर्सचा कोर्स; ९ कृषिविज्ञानाचा कोर्स; ९ इंडस्ट्रियल इंजिनियरचा कोर्स व १० व्यापार शिक्षणाचा कोर्स इतक्या वर्गाची सोय करण्यांत आली होती. जुन्या लष्करी विद्यालयाचे अध्यापकच या विद्यालयांत शिक्षकांचे काम करीत असत. व त्यांच्या वाटणीत, पूर्वीचा लष्करी बांधकामाचा अध्यापक, तोफखान्याचा ऑफिसर किंवा लष्करी इंजिनियरिंग मधील आफीसर याविद्यालयांत शेतकी शिक्षणाच्या वर्गावर आणि तसाच दुसरा लष्करी इंजिनियर पायलेटच्या वर्गाचे काम पाहत असे ! अर्थात्च या साऱ्या धंदेशिक्षणास आवश्यक अशा व्यावहारिक व प्रत्यक्ष ज्ञानाची सोय करतां येणे अशक्य झाल्यामुळे, या विद्यालयांतून धंदे कोणीच शिकला नाही. गणीत व चित्रकला या दोन विषयांचा मात्र विद्यार्थ्यांना थोडासा उपयोग झाला. . इ. स. १८९३ त ही वांझोटी शाळा बंद करून तिच्या जागी वर सांगितलेली कला व धंदे शिकविणारी शाळा सरकारने उघडली. गिलावा, पेंटिंग, गिलिट, एन्ग्रेव्हिंग, नकशी, कांतकाम, लोहारकाम, बाइंडिंग, स्कलप्चर, सुतारकाम, सर्व्हेइंग, गंवडीकाम, वॉचमेकिंग इत्यादि सुधारलेल्या साऱ्या धंद्याच्या शिक्षणाची सोय तींत करण्यांत येऊन त्या त्या कलेतील व धंद्यातील वाकबगार कारागीर पोर्तुगालमधून किंवा ब्रिटिश हिंदुस्थानांतून आणले होते. शाळा पांचच वर्षे टिकली. परंतु बाकी साऱ्या भारोभार धंद्यापेक्षां बाइडिंगचा वर्गच कायतो बराच जोमाने चालला होता व त्याच धंद्याचा फायदा गोव्याला झाला. आजमितीस गोव्यांत में बांइडिंगचें सुबक व टिकाव काम होते ते याच शाळेमुळे होय, असे म्हणण्यास प्रत्यवाय नाही. हिंदुस्थानांत किंवा आफ्रिकेंत नोकरीप्रीत्यर्थ जाणाऱ्या गोमंतकीयांच्या सोयीसाठी इ. स. १८९९ साली बुककीपिंगच्या शिक्षणाची सोय त्यावेळचे गव्हर्नर माशाद यांनी केली. अभ्यासक्रम दोन वर्षांचा होता. परंतु त्याचाही लवकरच अस्त झाला.