पान:गोमंतक परिचय.pdf/204

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

गोमंतक परिचय येऊन त्या ऐवजी पायलेटचे शिक्षण देण्याचा वर्ग याच शाळेला जोडण्यात आला. या इश्कोलाचा अभ्यासक्रम ६ वर्षांचा होता. लष्करी इंजिनियर, तोफखाना व पायदळाचे ऑफिसर वगैरे याच विद्यालयांतून तयार होत. पुढे १८४३ साली नाविक शाळेचे पुनरुज्जीवन झाले व तीही याच विद्यालयाला जोडण्यांत आली. मुख्य प्राथमिक शाळेत चालणारा पदार्थ विज्ञानशास्त्र व रसायनशास्त्र यांचा वर्ग इ. स. १८५३ साली याच विद्यालयाला जोडण्यांत येऊन तो इ. स. १८६५ पर्यंत चालला होता. इ. स. १८६८ आणखी एकदां या विद्यालयाची पुर्नघटना झाली. त्यांत तिचे स्वरूप केवळ लष्करीच न राहतां सामान्य प्रजेची देखील वरिष्ट शिक्षणाची सोय व्हावी असी तिची रचना झाली. पायदळ ऑफिसरांस दोन. वर्षांचा, अभ्यासक्रम तोफखान्यावरील ऑफीसरांनां ६ वर्षांचा व इजिनियरिंग शाखेचा सात वर्षांचा ठरला होता. परंतु ही योजना फार काळ न चालतां, माशेलांतील बंडानंतर गोव्यांतील लष्करच कमी झाले व विद्यालय देखील बंद करण्यांत येऊन त्या ऐवजी इंस्तितूत प्रोफिसियोनाल (धंदोशक्षणाची शाळा ) नांवाचे विद्यालय उघडण्यांत आले. शतवार्षिक उच्च शिक्षणाचा आढावाः-प्राथमिक किंवा दुय्यम शिक्षणाच्या आढाव्याप्रमाणे हा आढावा आंकड्यानी देणे साधनाभावी शक्य नाही. परंतु एक गोष्ट मात्र सांगावयाला हरकत नाही. व ती हीच की, पाद्रींच्या विद्यालयांतून मिळालेल्या वांझोट्या व खच्ची शिक्षणाऐवजी या मिलिटरी शाळांतून मिळणारे शिक्षण विशेष व्यापक स्वरूपाचे व पूर्वग्रहविरहित होते. पहिले जेवढे अंधपरंपरेचे तेवढेच हे. व्यापक व उज्ज्वल होते. ही शंभर वर्षे म्हणजे गोमंतकांतील उच्च शिक्षणाचे सुवर्णयुगच होय. बर्नार्दु पॅरिश द सील्व्ह, बर्नादु फ्रांसीस्कु दा कोश्त, जुजे दा कोइतकांपुश,, व्हिकोंदि द बुसेलुश् , इत्यादि विद्वान याच विद्यालयाचे विद्यार्थी होते. वैशेषिक शिक्षणः–पशुवैद्यकाची शाळा, शेतकी शाळा, उपरोच्चारित कला व धंदे यांची शाळा, ( इश्कोलद आर्तिज् इ ओफीस्युश् ) व्यापारी शाळा व वैद्यक शाळा, यांच्या द्वारे सरकारनें वैशेषिक शिक्षण देण्याचे प्रयत्न केले होते. आज मितीस या सर्व प्रयत्नांतून केवळ वैद्यकपाठशाळाच काय ती जीवंत आहे. तिचा विचार स्वतंत्र. पणे करावयाचा असल्यामुळे इतर प्रयत्नाचे थोडथोडे स्वरूपदर्शन आधी करूं. माटाकाची शाळा इ. स. १८६६ स्थापन करण्याचे ठरून त्याप्रमाणे एक पशु-- बटा नेमलाही गेला परंतु त्या शिक्षणाकडे विद्यार्थ्यांचे लक्ष्यच न गेल्यामुळे इ. स.