पान:गोमंतक परिचय.pdf/203

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

प्रकरण ६ वें. प्रकरण सहावे. उच्च व वैशेषिक शिक्षण. awan अव्वल पोर्तुगीजशाहीतील योजनाः-आधी धर्म व मग राजकारण हे तत्व जेव्हांपासून पोर्तुगीज राज्यव्यवस्थेत शिरले, तेव्हांपासून त्यांच्या अवनतीस आरंभ झाला, हे आम्ही पूर्वी सांगितलेच आहे. जगाच्या कोणत्याही भागांत हे सत्य सारखेच कटुफलदायी असते. पोर्तुगीज अमलाच्या पहिल्या शतक दीड शतकांत त्यांना पाखांडमतखंडन व सद्धर्मप्रसार यांशिवाय दुसरीकडे लक्ष्य द्यावयाला फुरसदच मिळाली नाही. जेसुइटांच्या हाती शिक्षणाची सारी सूत्रे असल्यामुळे त्यांनी धार्मिक शिक्षणाचे बंड माजवून बाकी विषयांकडे दुर्लक्षच केले होते. अर्थात्च सत्प्रवृत्त, असे जे काही थोडेसे व्हाइसरॉय होऊन गेले, त्यांचा शिक्षणप्रसाराचा सारा प्रयत्न फुकट गेला. __मिलिटरी स्कुलेः-तरीपण १८ व्या शतकांत त्याबाजूने थोडेसे प्रयत्न झालेच. त्यांपैकी व्हायसरॉय कोंदि द मॅग यांची नाविक शाळा आणि इ. स. १७७६ त स्थापन झालेलें, तोफखान्याचे शिक्षण मिळविण्याचे विद्यालय. हे प्रयत्न बराच काल टिकले. तोफखान्याच्या शाळेचे पुढे रूपांतर होऊन लष्करी बांधकामाची शाळा उघडली गेली व तिलाच उपरोक्त नाविक विद्यालय जोडले गेलें. इ. स. १८१७ साली या शाळांचं पुनः रूपांतर होऊन त्यांना आकादेमीय मिलितार द गोअ हे नांव मिळाले. अभ्यासक्रमही विस्तृत करून तत्कालीन यरोपियन लष्करी शाळांबरोबर पंचवार्षिक करण्यांत आला. सँढर्ट कॉलेजची मागणी हिंदुस्थानात नुकतीच चंचुप्रवेशानें पुरी होण्याच्या पंथास लागली आहे, या दृष्टीने पाहतां या विद्यालयाचे कौतुकच वाटेल. इ. स. १८४१ त व्हायसराय कोंदि द लीम याने या विद्यालयाची पुनर्घटना केली व तिला इश्कोल मातेमातिक इ मिलतार गणीत व लष्करी शिक्षणाची शाळा ) हे नांव दिले. नाविक विद्यालय नष्ट करण्यांत